शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
5
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
6
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
7
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
8
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
9
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
10
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
11
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
12
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
13
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
14
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
15
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
16
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
17
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
18
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
19
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!

गाव पाणीदार होण्यासाठी राबतात हजारो हात !

By admin | Updated: April 20, 2017 12:37 IST

खटावमध्ये आशादायी चित्र : वॉटरकपसाठी राजापूर, डिस्कळ, रणशिंगवाडी अन पांगरखेल गावांत मोठी चुरस

आॅनलाईन लोकमतबुध (जि. सातारा), दि. २0 : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारी गावे पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने एकत्र आल्याचे समाधानकारक चित्र खटाव तालुक्याच्या उत्तर भागात पाहायला मिळत आहे़ रणशिंगवाडी, राजापूर, डिस्कळ, पांगरखेल या गावांना वेध लागले आहेत ते आपले गाव पाणीदार बनवण्याचे़ त्यासाठी गावातील सर्वजण हातात फावडे आणि टिकाव घेऊन कामाला लागले आहेत.़ आपल्या गावाला बक्षिस मिळवुन गावातील शिवारात पाणी खेळावे यासाठी हजारो हात राबत असल्याचे आशादायक चित्र पाणी चळवळीला पाठबळ देत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्ष, गटात-तटात विभागलेली जनता वॉटर कप स्पर्धेच्या माध्यामातून जलसंधारणच्या कामासाठी एकाच झेंड्याखाली आली आहे़ भल्या पहाटे हातात टिकाव आणि फावडे, घमेली घेऊन श्रमदानासाठी मोठी गर्दी होत आहे.़ तरूणांबरोबर, ज्येष्ठ नागरिक, महिला श्रमदानात आघाडीवर असतनाही अशावेळी श्रमदान करण्याऱ्यांना पाणी देण्यासाठी बालगोपाळही सरसावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे़ दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्याने तरूणांचाही लक्षणिय सहभाग वाढत आहे. गावातील मुंबई, पुण्यातील चाकरमन्यांकडून या कामासाठी लागणारे टिकाव, फावडे, घमेली पुरवण्यात आल्याने कामाला चांगलीच गती मिळाली आहे.़ रणशिंगवाडी, पांगरेखेल, डिस्कळ, राजापूर या गावात एकीचे बळ पाहायला मिळत आहे. जवळजवळ लागून असलेल्या या गावामध्ये बक्षिस मिळवण्यासाठी मोठी चुरस लागली असून कोण बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे. गावातील प्रमुख युवा कार्यकर्ते दररोज श्रमदान करणाऱ्यांची यादी तयार करत असून त्या पध्दतीने नियोजन होत आहे़. पुण्या-मुंबईमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांचेही चांगले योगदान लाभत असल्याचे अशादायक चित्र पाहायला मिळत आहे. (वार्ताहर) जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढला...डिस्कळ, पांगरखेलमधील अनेक जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असून त्याचबरोबर सीसीटीचेही काम मोठ्या प्रमाणत करण्यात आले आहे़ पांगरखेलमधील श्रमदानामध्ये बुध व परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग आहे. पंचायत समितीचे उपसभापती कैलास घाडगे, माजी सरपंच ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. तर डिस्कळमधील पन्नास ते साठ तरूण दररोज श्रमदान करत आहेत. त्यांच्या कामाला सहकार्य करण्यासाठी ग्रामंपयातीने पुढाकर घेतल्यास मोठी चळवळ उभी राहणार आहे. ओढ्याच्या खोलीकरणाचे काम...या स्पर्धत पहिल्या दिवसापासून अगे्रसर असलेली रणशिंगवाडी आणि राजापूर याठिकाणच्या ओढ्यांचे खोलीकरण करणे, मातीबांध घालणे आदी कामे अगदी जलत गतीने केल्याचे पाहायला मिळत आहे़ या कामांमुळे राजापूर आणि रणशिंगवाडी गावामध्ये तरूणांचा एकोपा पहायला मिळत असल्याचे चित्र दिसत आहे़