शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हुमणीन कुरतडलं; भुंग्यान पोखरलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 16:13 IST

ढेबेवाडी (जि. सातारा) : चक्रीभुंग्यानं कुरतडलं आणि हुमणीनं पोखरल्यामुळे ढेबेवाडी विभागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पिकावरील किडीला थोपविण्याचे आव्हान समोर असतानाच कृषी अधिकारीच गायब झाल्याने या अधिकायांनाº शोधण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. 

ठळक मुद्देभुईमुगासह सोयाबीनची मुळे पोखरल्याने पिकाची नासधुस ढेबेवाडी विभागातील शेतकरी हतबलपिकावरील किडीला थोपविण्याचे आव्हान कृषी अधिकारीच गायब, अधिकायांनाº शोधण्याची वेळ शेतकरी कोमात पंपवाले जोमात!

ढेबेवाडी (जि. सातारा) : चक्रीभुंग्यानं कुरतडलं आणि हुमणीनं पोखरल्यामुळे ढेबेवाडी विभागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पिकावरील किडीला थोपविण्याचे आव्हान समोर असतानाच कृषी अधिकारीच गायब झाल्याने या अधिकायांनाº शोधण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. 

ढेबेवाडी विभागात पिकायोग्य पाऊस पडल्याने विभागातील शेतकºयांत समाधानाचे वातावरण होते. खरीप हंगाम यशस्वी होणार म्हणून खुशीत असलेल्या शेतकºयांच्या आनंदावर अखेर चक्री भुंगा, मावा आणि हुमणीनं विरजन टाकल.

भुईमुगासह सोयाबीन पीकांची मुळे पोखरल्याने हिरवीगार पिके लगेचच कोमेजून जात आहेत.  तर यावर्षी माव्याच्या जोडीलाच चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव वाढल्याने हायब्रीडसह इतर कडधान्याच्या पिकांची पाने नाहीशी झाली आहेत.

वास्तविक, या विभागातील शेतकरी खरीपावरच अवलंबून असतो. समाधानकारक पाउस झाल्याने भरभरून धान्य निघेल, या आशेवर असणाºया शेतकºयांची सध्या निराशा झाली आहे. भुंगे, हुमणी, किडे आदींचा प्रतिकार करताना तारेवरची कसरत करणाºया शेतकºयाला कोणी वाली आहे, का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या विभागातील कृषी अधिकारी गत अनेक महिन्यांपासून विभागात फिरकलेले नाहीत. त्यामुळे मार्गदर्शन घ्यायचे कुणाचे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. पंपाला शंभर....आठ दिवसांनी नंबर !

शेतात किटकनाशक फवारणी करणारे काही ठराविक मजूर आहेत. शेतकरी या मजुरांमार्फत शेतात फवारणी करतात. शेतकºयांनी किटकनाशक आणि पाणी पुरवठा करायचा. मग १५ लिटरच्या एका पंपाची फवारणी करून द्यायला मजुर शंभर रूपये घेतात. त्यासाठीही कमीत कमी आठ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकºयांच्या अडचणीत भरच पडत आहे .शेतकरी कोमात पंपवाले जोमात!

किडीचा प्रादुर्भाव आणि हिंस्त्र प्राण्यांकडून होणाºया नुकसानीमुळे शेतकरी कोमात जरी गेला असला तरी पंपवाला मजूर मात्र भलताच जोमात आहे. दिवसभरात सुमारे २५ ते ३० पंप फवारणी करून सुमारे अडीच ते तीन हजाराची दररोज कमाई तो करत आहे. कृषी अधिकाºयांचा भरवसा हाय काय?

या विभागातील कृषी विभाग कुठे आहे, याचा शेतकºयांना थांगपत्ताच नाही. येथील अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केल्याचे कधी ऐकीवात नाही. तर शेतकरी दुरध्वनीवरून येणाºया कृषी संदेशानुसारच फवारणी करतात, असेही काही शेतकºयांनी सांगीतले.