शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

अण्णांबद्दल उमातार्इंना सांगायचे कसे?

By admin | Updated: February 23, 2015 00:46 IST

पानसरे कुटुंबीयांसमोर प्रश्न : नातेवाईक, कार्यकर्त्यांची रुग्णालयात रीघ

कोल्हापूर : पानसरे अण्णांना आयुष्यभर सावलीसारखी साथ देणाऱ्या उमातार्इंना अण्णा आपल्यातून निघून गेल्याचे सांगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे. भ्याड हल्ल्यात उमातार्इंच्या मेंदूला झालेली इजा आणि त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अण्णांच्या निधनाचे वृत्त तूर्त, तरी न सांगण्याचा निर्णय घेतला आहे. उमातार्इंच्या प्रकृतीची चौकशी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना भेटण्यासाठी त्यांच्या नातेवाईक, कार्यकर्त्यांची रुग्णालयात रविवारी रीघ लागली होती.गेल्या बारा वर्षांपूर्वी अवी पानसरे यांचे अचानक निधन झाले. त्या धक्क्यातून उमाताई लवकर सावरल्या नव्हत्या. त्यानंतर अण्णा त्यांना बाहेरील कार्यक्रम, अन्य ठिकाणी जाताना कायम समवेत घ्यायचे. आंदोलने, वकिली आदी स्वरूपातील दैनंदिन कामे उरकल्यानंतर ते अधिकतर वेळ उमातार्इंसाठी देत होते. त्या दोघांचा एकमेकांना मोठा आधार होता. शिवाय त्यांच्यातील भावनिक बंध अतूट होते.भ्याड हल्ल्यानंतर या दोघांवर तातडीने उपचार झाले. त्यातून उमातार्इंच्या प्रकृती दिवसागणिक सुधारत आहे. त्या बोलत आहेत. अशा स्थितीत त्यांना अण्णांच्या निधनाचे वृत्त सांगितल्यास त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉक्टरांचा सल्ला आणि उमातार्इंची प्रकृती सुधारावी याची दक्षता म्हणून कुटुंबीयांनी अण्णांच्या निधनाचे वृत्त त्यांना न सांगण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय प्रकृती सुधारल्यानंतर देखील त्यांना हे वृत्त कसे सांगायचे, असा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. दरम्यान, पानसरे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासह उमातार्इंच्या प्रकृतीची चौकशीसाठी रविवारी दिवसभर नातेवाईक, कार्यकर्ते रुग्णालयात, त्यांच्या निवासस्थानी येत होते. त्यात पानसरे यांच्या जन्मगाव कोल्हार, रहाटा, अहमदनगर, नेवासे, नाशिक आदी ठिकाणांचे नातेवाईक, कार्यकर्त्यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)मेघा पानसरेंवर जबाबदारी...अण्णांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता. त्याबद्दल्यात दररोज खाव्या लागणाऱ्या गोळ्या अण्णांना आवडत नव्हत्या. गोळ्या खाऊन जगायचे त्यांना रूचत नव्हते. पण, अवी यांच्या निधनामुळे सून मेघा आणि नातू कबीर व मल्हार यांना सांभाळणे, त्यांना बळ देण्याची जबाबदारी असल्याने गोळ्या खाऊन ते तब्येत सांभाळून होते. मुलगा गेल्यानंतरही ते खचून न जाता ठामपणे उभे राहिले. आता अण्णांच्या निधनामुळे कुटुंबाची जबाबदारी मेघा पानसरे यांच्यावर पडली आहे. अधिवेशनाचे काय?उमातार्इंची प्रकृती स्थिर असून त्यामध्ये सुधारणा होत आहे. त्या बोलत आहेत. दक्षता म्हणून त्यांना त्यांच्या कन्या मेघा व स्मिता तसेच स्नुषा मेघा यांनाच भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी सोडण्यात येते. बाबांची तब्येत सुधारत असल्याचे त्यांना सांगण्यात येते. उमातार्इंनी शनिवारी तोंडावाटे ज्यूस घेतला शिवाय त्यांनी पक्षाचे अधिवेशन आहे ना? हे दवाखान्यात आहेत मग, अधिवेशनाचे काय झाले? असे मेघा व स्मिता यांच्याकडे विचारणा केली.कार्यालयात नीरव शांतता...कामगार, मोलकरणी, अंगणवाडी सेविका अशा कष्टकरी, सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठीचा लढा, आंदोलनांचा निर्णय घेणे, चर्चासत्र, अधिवेशनाचे नियोजन आदींची धांदल सुरू असलेल्या बिंदू चौक येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात रविवारी नीरव शांतता होती. ‘लढेंगे, जितेंगे! कॉ. गोविंद पानसरे को लाल सलाम. पानसरे मरे नहीं! पानसरे मरते नहीं! अण्णा हा लढा थांबणार नाही!’ हा नोटीस फलकावरील मजकूर नजरेत साठवून ‘कॉम्रेड रडायचं नाही, लढायचं’ असा निर्धार आणि हुंदका आवरून कार्यकर्ते हे कार्यालयातील अण्णांच्या खुर्चीचे दर्शन घेऊन बाहेर पडत होते.