पाच कामगारांत बांधकाम करायचे कसे..? , कामाच्या ठिकाणी राहणार कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:17 PM2020-04-24T12:17:39+5:302020-04-24T12:19:48+5:30

मात्र जी अपार्टमेंटची मोठी कामे आहेत, त्यांचे स्लॅब अवघ्या पाच कामगारांत पूर्ण होऊ शकत नसल्याचे मत बांधकाम व्यावसायिक व्यक्त करतात. बांधकाम व्यावसायिकांकडून प्रशासन १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर शपथपत्र लिहून घेणार आहे. साहजिकच काही वाईट घटना घडली तर आपण दाढेला जाऊ, अशी भीती बांधकाम व्यावसायिकांमध्ये आहे.

How to build in five workers ..? | पाच कामगारांत बांधकाम करायचे कसे..? , कामाच्या ठिकाणी राहणार कसे

पाच कामगारांत बांधकाम करायचे कसे..? , कामाच्या ठिकाणी राहणार कसे

googlenewsNext
ठळक मुद्देव्यावसायिकांचा प्रश्न : बांधकामासाठी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक

सागर गुजर ।

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणी बांधकामे सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असली तरी केवळ पाच लोकांत मोठी बांधकामे कशी करता येणार? हा प्रश्न बांधकाम व्यावसायिकांना सतावतो आहे.
लॉकडाऊनच्या आधी जी बांधकामे सुरू होती, ती कामे सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने ग्रीन सिग्नल दाखविला आहे; परंतु त्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. ही बांधकामे करत असताना पाच कामगारांच्यावर कामगार ठेवण्यावर निर्बंध घालण्यात आलेला आहे.

जी छोटी बांधकामे आहेत, अथवा किरकोळ कामे राहिली आहेत, ती या आदेशानुसार करता येतील. मात्र जी अपार्टमेंटची मोठी कामे आहेत, त्यांचे स्लॅब अवघ्या पाच कामगारांत पूर्ण होऊ शकत नसल्याचे मत बांधकाम व्यावसायिक व्यक्त करतात. बांधकाम व्यावसायिकांकडून प्रशासन १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर शपथपत्र लिहून घेणार आहे. साहजिकच काही वाईट घटना घडली तर आपण दाढेला जाऊ, अशी भीती बांधकाम व्यावसायिकांमध्ये आहे.

परजिल्ह्यातील कामगारांना नो एंट्री
नव्याने परजिल्ह्यातील कामगार कामावर येणार नाहीत, याची सर्वस्वी जबाबदारी बांधकाम ठेकेदारावर टाकण्यात आलेली आहे. कामाच्या ठिकाणी सॅनिटायझरची सोय करायची असून, सोशल डिस्टंन्सिंगचे तसेच सुरक्षेचे नियम पाळणे बंधनकारक आहे.

या आहेत अटी

  • कोरोनाबाधित क्षेत्र वगळून असलेल्या क्षेत्रात परवानगी
  • प्रांताधिकाºयांची रितसर परवानगी आवश्यक
  • शहरी भागात पूर्वीची बांधकामे चालू ठेवता येतील
  • बांधकाम कामगार कामाच्या ठिकाणी राहणे आवश्यक
  • ग्रामीण भागातील बांधकामांसाठी परवानगी आवश्यक
  • बांधकाम व्यावसायिकाचे शपथपत्र आवश्यक

 

कोरोनाशी सामना करत असताना अर्थचक्रही सुरू राहणे गरजेचे आहे. उद्योग व्यवसाय सुरू राहिले तर हातावर पोट असणाºया लोकांना दिलासा मिळेल. राज्य शासनाने गोंधळ वाढवून ठेवण्यापेक्षा योग्य ते निर्णय घ्यावेत.
- शंकर माळवदे, माजी उपनगराध्यक्ष सातारा

बांधकामांना परवानगी देताना प्रशासनाने या व्यवसायासाठी वस्तू पुरवठा करणारी स्टील, सिमेंट, वीट, पेंट याची दुकानेही सुरू राहणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांप्रमाणे ही दुकानेही काही काळ सुरू ठेवली जाणे आवश्यक आहे.
- मनीष पवार, बांधकाम व्यावसायिक

Web Title: How to build in five workers ..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.