आळजापूर (ता. फलटण) गावच्या उपसरपंच राजकुवर तुकाराम नलवडे या फलटण-सातारा रस्त्यावर आदर्की बु. येथे कुंटुबासह राहतात. दि. २ रोजी रात्री ११ ते पहाटे ३ च्यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी बेडरूमच्या दरवाजाचा कडी-कोयडा तोडून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने, दीड तोळकयाचे गंठण, अर्धा तोळ्याची अंगठी, दोन ग्रॅमची बाळी, तीन ग्रॅमची लहान अंगठी, कानातील गोळे व ५६ हजार ११२ रुपये रोख मिळून दोन लाख सात हजारांची चोरी केल्याची फिर्याद लोणंद पोलीस स्टेशनला दिली आहे. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळास फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने, हवालदार अविनाश नलवडे, नाना होले, अमोल पवार, धायगुडे, पोलीस पाटील भिंगारे यांनी भेट दिली.
आळजापूरच्या उपसरपंचांचे घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:15 IST