शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात घरासह ऊसतोड मजुरांच्या झोपडीला आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

By सचिन काकडे | Updated: March 12, 2024 19:16 IST

सातारा : साताऱ्यातील मतकर कॉलनीतील एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तर साेनगाव कचरा डेपोजवळ असलेल्या ऊसतोड मजुरांची झोपडीही आगीत ...

सातारा : साताऱ्यातील मतकर कॉलनीतील एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तर साेनगाव कचरा डेपोजवळ असलेल्या ऊसतोड मजुरांची झोपडीही आगीत खाक झाली. आज, मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनांमध्ये संसारोपयोगी साहित्य जळाल्याने दोन्ही कुटुंबांचे मोठे नुकसान झाले.याबाबत अधिक माहिती अशी की, मतकर कॉलनीत शांताराम धोत्रे यांचे घर आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाल्याने त्यांच्या घरातील वस्तूंनी पेट घेतला. काही वेळात अन्य वस्तूही आगीच्या भक्षस्थानी पडल्या. पालिकेचे वाहतूक विभाग प्रमुख प्रशांत निकम यांना या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी हणमंत फडतरे, राम इंगवले, वैभव अडागळे यांनी यंत्रणेसह घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेत धाेत्रे यांच्या घरातील पैसे, कपडे तसेच अन्य साहित्य जळाल्याने प्रचंड नुकसान झाले. आगीची दुसरी घटना दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास सोनगाव कचरा डेपोजवळ घडली. येथे असलेल्या ऊसतोड मजुरांच्या एका झोपडीला आग लागली. पालिकेच्या अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. झोपडीला नेमकी कशामुळे आग लागली? याचे कारण समजू शकले नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग