शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विवाह इच्छुकांचं घोडं अडलं; मध्यस्थांचा ‘भाव’ वधारला! पिता धायकुतीला ,पैशाशिवाय ‘बायोडाटा’ही पाहायला मिळेना-नवरी मिळेना नवऱ्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:45 IST

कºहाड : मंडईत आपण दरासाठी घासाघीस करू शकतो; पण ‘बायोडाटा’च्या बाजारात ते चालत नाही. घासाघीस करणाºयाला तिथं किंमत नाही. आधीच घोडं अडलेलं, त्यात मध्यस्थांचा भाव वधारलेला.

संजय पाटील।कºहाड : मंडईत आपण दरासाठी घासाघीस करू शकतो; पण ‘बायोडाटा’च्या बाजारात ते चालत नाही. घासाघीस करणाºयाला तिथं किंमत नाही. आधीच घोडं अडलेलं, त्यात मध्यस्थांचा भाव वधारलेला. त्यामुळे वराचा पिता फक्त ‘स्थळा’ची माहिती मिळवायला मध्यस्थाच्या खिशात पाचशेची नोट सरकावतो. नोटीशिवाय मध्यस्थी हालत नाही आणि नवºयाला नवरी नव्हे, साधा ‘बायोडाटा’ही पाहायला मिळत नाही.जिथं तिथं सध्या लग्नाचा बाजार मांडला गेलाय. काही वर्षांपूर्वी पाहुण्यात पाहुणं होण्याची प्रथा होती. मुलगी नातेवाइकांच्या मुलाला देण्यास प्राधान्य दिले जायचे. मात्र, सध्या हा गोतावळा मागे पडत चाललाय. मुलगी पाहुण्यात नव्हे तर पाहुण्याच्या पाहुण्याला देण्यासही अपवाद वगळता कोणी उत्सुक नसल्याचे दिसते. त्यामुळे अपेक्षित स्थळ मिळण्यासाठी पालक मध्यस्थांच्या दारी हेलपाटे घालतायंत. काही वर्षांपूर्वी मध्यस्थांचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होते. त्यावेळी त्यांनाही म्हणावे तेवढे महत्त्व नव्हते. मात्र, सध्या मध्यस्थाशिवाय पान हालत नाही, अशी परिस्थिती आहे. मध्यस्थांच्या माध्यमातून विवाह ठरण्याचे प्रमाण वाढायला लागल्याने अनेकजण त्यांच्याकडे स्थळासाठी जातात. मात्र, मध्यस्थांचा हा वधारलेला भाव पाहून अनेकांनी काही संबंध नसताना या व्यवसायात शिरकाव केलाय.विवाह जुळवून देणाºया अनेक नोंदणीकृत संस्था आहेत. या संस्थांमधून नियमानुसार फी आकारून विवाह जुळवून देण्याचे काम केले जाते. मात्र, या संस्थांव्यतिरिक्त अनेकांनी मध्यस्थीच्या नावाखाली लग्न जुळवून देण्याचा नवा बिनभांडवली व्यवसाय सुरू केलाय. या बिनभांडवली व्यवसायात ‘बायोडाटा’ला महत्त्व आहे आणि तोही मुलगा अथवा मुलीच्या वडिलांकडून त्यांना घरपोच केला जातो. नुसता ‘बायोडाटा’ देऊन चालत नाही तर त्यासोबत किमान पाचशेची नोट द्यावी लागते. पैसे मिळाले तरच हे मध्यस्थी ‘बायोडाटा’ पुढे सरकवतात. स्थळ सूचवतात. त्यासाठी वराच्या पित्याला संबंधित मध्यस्थाशी कायम संपर्कात राहावे लागते. वारंवार त्याला भेटावे लागते.वर्षानुवर्षे विवाह जुळवून देण्याचे काम करणारे मध्यस्थी विश्वासाने हे काम पार पाडतात; पण फक्त पैसे कमविण्यासाठी मध्यस्थाची भूमिका पार पाडणारे विवाह ठरविण्याऐवजी पालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतायंत. पाचशे, हजार, दोन हजार अशी वारंवार पैशाची मागणी होते आणि विवाह रखडल्यामुळे मुलाचे पालक कसलाही विचार न करता संबंधिताचे खिसे गरम करतात..अनेक मध्यस्थांचे प्रामाणिक प्रयत्नअनेक मध्यस्थी विवाह जुळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे धडपड करतात. संकलित झालेल्या सर्व ‘बायोडाटा’तून अनुरूप ‘बायोडाटा’ मुलगी अथवा मुलाच्या पालकांना देतात. त्यांची बोलणी करून देतात. दोन्ही बाजूंची अपेक्षापूर्ती होत असेल तर पुढाकार घेऊन लग्नही जुळवून देतात. मात्र, मध्यस्थी करण्याच्या नावाखाली काहीजणांनी विवाह रखडलेल्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. अशा खोट्या मध्यस्थांमुळे प्रामाणिकपणे मध्यस्थी करणाºयांनाही त्याचा नाहक त्रास होतो.

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसा