शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाची डागडुजी, खड्डे भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:53 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगलोर महामार्गाच्या डागडुजीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. शेंद्रे ते नीरा पूल या दरम्यान रस्त्यावर युध्दपातळीवर खड्डे मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठळक मुद्दे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाची डागडुजी, खड्डे भरले शेंद्रे ते नीरा रस्त्याचे काम; पुणे-मुंबईतील चाकरमान्यांना दिलासा

सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगलोर महामार्गाच्या डागडुजीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. शेंद्रे ते नीरा पूल या दरम्यान रस्त्यावर युध्दपातळीवर खड्डे मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनला सुरुवात झाली आहे. सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच भर पावसामध्ये हे खड्डे भरणे जिकरीचे ठरत आहे. पाऊस उस्संत घेत नसल्याने महामार्ग प्राधिकरणाने न थांबता कामाला सुरुवात केली आहे.

गणेशोत्सव तोंडावर असल्याने मुंबई, पुणे, ठाणे या परिसरात राहणारे चाकरमानी गावाकडे परतू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी हे काम महत्त्वाचे ठरणार आहे.महामार्ग प्राधिकरणातर्फे या कामासाठी दोन टीम तयार केल्या आहेत. हायवे पेट्रोलिंग टीमदेखील या कामामध्ये आपला हातभार लावत आहे. नीरा ते सुरुर एक टीम व दुसरी टीम शेंद्रे, सातारा परिसरात काम करत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अखंडितपणे आता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

सर्वात पहिल्यांदा रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात आले. त्यानंतर उड्डाण पुलांच्यावर खराब रस्ता उखडून काढण्यात आला. त्याठिकाणी नव्याने सर्व काम सील कोट पद्धतीने करण्यात येत आहे.

महामार्गावरील शिवराज पेट्रोल पंप, खिंडवाडी, अजठा चौक, देगाव फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, वाढे फाटा, डी मार्ट च्या समोर, लिंब खिंड, रायगाव फाटा, गौरीशंकर नॉलेज सिटी, समोर नागेवाडी परिसरात हे काम सुरु आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने हे काम सुरु आहे.पावसाचा अडथळा तरीही कामडांबरीकरणाच्या कामात पावसाचा अडथळा प्रामुख्याने येत आहे. हा अडथळा दूर करुन महामार्ग प्राधिकरणातर्फे हे काम सुरु आहे. मंगळवारी पावसाने थोडी उस्संत घेताच वेगाने काम करण्यात आले. पाऊस थांबला तर खड्ड्यांतील डांबराला कोणताही धोका पोहोचणार नाही.

 

टॅग्स :highwayमहामार्गSatara areaसातारा परिसरGanpati Festivalगणेशोत्सव