शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोनाला हरवून टाकायचं हाय, चिमुकली घालतेय साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:58 IST

सई विनोद बडेकर. पाच वर्षांची ही चिमुरडी पाटण तालुक्यातील गुढे येथील. ती आपल्या कलेद्वारे कोरोनाविषयी जनजागृती करीत आहे. रडायचं नाही, हरायचं नाही; उलट कोरोनाला हरवायचंय, अशी साद ती जनतेला घालत आहे.

ठळक मुद्देकोरोनाला हरवून टाकायचं हाय, चिमुकली घालतेय साद कलेद्वारे कोरोना विरोधात लढण्यासाठी जागृती

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासनासह अनेक घटक समाजप्रबोधन करीत आहेत. यामध्ये चिमुकलेही मागे नाहीत. त्यापैकीच सई विनोद बडेकर. पाच वर्षांची ही चिमुरडी पाटण तालुक्यातील गुढे येथील. ती आपल्या कलेद्वारे कोरोनाविषयी जनजागृती करीत आहे. रडायचं नाही, हरायचं नाही; उलट कोरोनाला हरवायचंय, अशी साद ती जनतेला घालत आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या संकटाला सर्वचजण सामोरे जात आहेत. शासन, प्रशासन कोरोना जागृती करत आहे. तसेच विविध संस्था, नागरिकही पुढे येत आहेत. असे असतानाच सई बडेकर ही चिमुकली ही कोरोनाच्या जागृतीसाठी काम करत आहे. त्यासाठी ती सुंदर उदाहरणेही देत आहे.

सई एक अत्यंत महत्वूपर्ण उदाहरण देत असते. ते म्हणजे आईच्या गर्भात आपण नऊ महिने थांबलो. आईने आपल्याला पोटातच सांभाळले. व्यवस्थित जगण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी काही दिवस आपण घरात थांबू शकत नाही का? असा सवालही ती रोखठोकपणे लोकांना विचारत आहे.शत्रू दारात उभा आहे, त्याला संयम आणि गनिमी काव्याने हरवले पाहिजे, असे ती सांगते. इतकेच नव्हे तर ही पाच वर्षांची चिमुरडी सरकारला साथ द्या, असे आवाहनही करत आहे. आरोग्य कर्मचारी, अधिकारी, नर्स हे सर्वजण आपल्यासाठी लढत आहेत. त्यांना आपण घरातच बसून धन्यवाद दिले पाहिजेत, असेही सांगायला ती विसरत नाही.

केवळ पाच वर्षांच्या वयात अचुक शब्दफेक आणि द्यायवा आहे जो संदेश तो ठामपणे देत आहे. त्याबाबतीत आपुलकी आणि उत्कृष्ट हावभाव याचा सुंदर मिलाफ तिच्या सादरीकरणात दिसून येत असल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या कलेचा वापर प्रबोधनासाठी कसा करावा याचे उदाहरणच तिने घालून दिले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर