शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला

By प्रमोद सुकरे | Updated: September 16, 2022 15:34 IST

महाबळेश्वर येथे गेल्या चोवीस तासात तब्बल ११८ मिलीमीटर पावसाची नोंद

कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात प्रतिसेकंद ३० हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरण ९९ टक्के भरले असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे साडे चार फुटांनी उघडण्यात आले आहेत. पायथा वीजगृह आणि दरवाजांतून प्रतिसेकंद ४२,३३१ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने कोयना नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणि धरणात पाण्याची आवक वाढल्याने गुरूवारी रात्री १० वाजता एक फुटावर स्थिर असणारे धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फुटाने उघडण्यात आले. तसेच शुक्रवारी सकाळी १० वाजता दरवाजे साडे चार फूट करण्यात आले. पायथा वीजगृहातून १०५० आणि वक्र दरवाजांतून ४१,२८१, असा एकूण ४२,३३१ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर येथे गेल्या चोवीस तासात तब्बल ११८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच कोयनानगर येथे ६२ मिलीमीटर आणि नवजा येथे ६१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. परतीच्या पावसामुळे धरण ९९ टक्के भरले आहे. धरणात १०४.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे धरणात प्रतिसेकंद ३० हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊस