शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: रहिमतपुरात पावसाचे तांडव, कमंडलू नदीवरील पुलाचा भराव ढासळला; वाहतूक ठप्प, पिके गेली वाहून

By प्रशांत कोळी | Updated: October 14, 2022 19:00 IST

पुलाचे लोखंडी दरवाजे न उघडण्याचा जोरदार फटका पुलाला व शेजारील डांबरी रस्त्याला बसला

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात पावसाने अक्षरशः तांडव केले. धुवाधार पावसाने कमंडलू नदीवरील पुलाचा भराव ढासळला असून पुलाचे लोखंडी अँगल वाहून गेले आहेत. तर ओढ्याला आलेल्या मोठ्या पुरामुळे अनेक गावातील लहान पूल सिमेंटच्या पाईपसह वाहून गेले. ओढ्याच्या बाजूच्या शेतातील पिकेही वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले. अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली.रहिमतपूर परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह धुवाधार पावसाला सुरुवात झाली. कमंडलू नदीवरील पुलावरून पाणी वाहिले. या पुलाचे लोखंडी दरवाजे न उघडण्याचा जोरदार फटका पुलाला व शेजारील डांबरी रस्त्याला बसला आहे. सुमारे एक टन वजनाचा एक दरवाजा याप्रमाणे दहा दरवाजे या पुलाला बसविण्यात आले आहेत. मात्र पावसाचे तांडव सुरू असतानाही दरवाजे न उचलल्यामुळे पुराच्या पाण्याचा फटका पुलावरील लोखंडी पाईपला बसून लोखंडी पाइप तुटून वाहून गेल्या. तसेच पाण्याच्या दाबामुळे पुलाचा भराव ढासळला असून, पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, काही लोखंडी पाइप मोडलेल्या स्थितीत पुलावरच आडव्या अस्ताव्यस्त पडल्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक बंद झाली होती. नदीच्या काठाला कडब्याच्या लावलेल्या अनेक गंजी व शेणखताचे उकिरडे वाहून गेले आहेत. जोरदार पावसामुळे क्रीडा संकुलाच्या ओढ्याकडील अनेक व्यापारी गाळ्यांमध्ये पाणी शिरले.साप येथील गावडे मळा येथे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याला मोठा पूर आल्यामुळे ओढ्यावरील सिमेंट पाईप टाकलेला रस्ता सिमेंट पाइपसह वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांसह शेतकऱ्यांशी गैरसोय झाली आहे. सुर्ली येथील करंजाली ओढ्याला आलेल्या मोठ्या पुरामुळे पूल आणि रस्त्यांमधील भराव वाहून गेला आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.जयपुरातील दोन एकरातील पीक गेले वाहून...अतिवृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या महापुरामुळे ओढ्याकडेच्या शेतातील प्रकाश निकम यांचे वीस गुंठे शेतातील आले पीक, विठ्ठल निकम यांचे दहा गुंठे शेतातील सोयाबीन, बबन पवार यांचे दहा गुंठे शेतातील ऊस व प्रल्हाद निकम यांच्या चाळीस गुंठे शेतातील टोमॅटो पीक असे एकूण दोन एकरातील शेतीपिके वाहून गेली आहेत. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. सरपंच, उपसरपंच, कृषी सहायक, मंडलाधिकारी विनोद सावंत व तलाठी अनिल दिंडे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामा केला आहे. हातातोंडाला आलेली पिके पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी