शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात पावसाचा जोर कायम, कोयनेत ९ हजार क्यूसेकने आवक 

By नितीन काळेल | Updated: July 1, 2023 12:21 IST

कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी आणि कोयना खोऱ्यातील नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजाला सर्वाधिक ९२ मिलीमीटरची नोंद झाली. तर धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने कोयना धरणातील पाणीसाठा १२.७६ टीएमसी झाला होता. त्याचबरोबर धरणात ९ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला. तरीही मागील सात दिवसांपासून पूर्व भाग वगळता पश्चिमेकडे सर्वदूर पाऊस पडत आहे. मागील चार दिवसांपासून तर संततधार सुरू आहे. यामुळे कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी आणि कोयना खोऱ्यातील नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले आहे. या पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजाला ९२ आणि महाबळेश्वर येथे ८५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. एक जूनपासूनचा विचार करता आतापर्यंत कोयनेला ४६३ आणि नवजाला ६३१ मिलीमीटर पाऊस झाला. तर सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला ८०८ मिलीमीटर पडला आहे.पश्चिम भागातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी, कोयना धरण क्षेत्रात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरूच आहे. त्यातच कोयनाक्षेत्रात पाऊस अधिक होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सात दिवसांत जवळपास अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला. तर धरणात शनिवारी सकाळच्या सुमारास ९ हजार १२९ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच होता.जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असलातरी पूर्व भागात प्रतीक्षा कायम आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरणी रखडली आहे. त्याचबरोबर पाणीटंचाईचे सावटही अनेक गावांवर आहे. येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यास खरीपाची पेरणी होऊ शकते. नाहीतर शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

साताऱ्यात सकाळपासूनच पाऊस...सातारा शहरातही मागील सात दिवसांपासून पाऊस पडत आहे. शनिवारीही सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना अडचणींचा सामना करावा लागला. तर सकाळी ११ नंतर ढगाळ वातावरण तयार झालेले. त्यानंतर दिवसभरात अनेकवेळा पाऊस पडला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानKoyana Damकोयना धरण