शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर‘धार’; महाबळेश्वर तालुक्यात वृध्द गेला वाहून 

By नितीन काळेल | Updated: July 2, 2024 19:10 IST

कोयना साठ्यात एक टीएमसीने वाढ : महाबळेश्वरला ११४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्याने घाटरस्त्यात दरड कोसळणे, झाडे पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातही धुवाॅंधार पाऊस पडत असल्याने घावरी येथील वृध्द ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला. संबंधिताचा शोध घेण्यात येत आहे. तर मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०२ आणि महाबळेश्वरला ११४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. कोयना धरण पाणीसाठ्यातही एक टीएमसीने वाढ झाली आहे. २१.१८ टीएमसी साठा झाला होता.जून महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढू लागला. कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पाऊस होत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर येथे ११४ मिलीमीटर झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत महाबळेश्वर येथे ९७७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वरचा पाऊसही एक हजार मिलीमीटरचा टप्पा पार करणार आहे. त्याचबरोबर कोयनानगर येथे आतापर्यंत ९४५ मिलीमीटर पाऊस झाला.नवजा परिसरातही दमदार पाऊस होत आहे. नवजाला २४ तासांत ६२ मिलीमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून १ हजार १३४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणक्षेत्रात ही पावसाचा जोर आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात सुमारे १३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली. सकाळच्या सुमारास धरण पाणीसाठा २१.१८ टीएमसी झाला होता. तर २०.१२ टक्केवारी होती.           पश्चिम भागात मागील आठ दिवसांपासून पाऊस जोर धरु लागल्याने ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. तसेच अनेक भागात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे. कांदाटी खोऱ्यात तर पावसाची संततधार असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. सातारा शहरातही पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी सकाळपासून जोरदार सरी कोसळत होत्या. यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले. त्याचबरोबर वाई, जावळी, कऱ्हाड, पाटण या तालुक्यांतही पावसाचे प्रमाण वाढले आहे.

पोलिस, ट्रेकर्सच्या सहाय्याने शोधकार्य; पावसामुळे अडचण..महाबळेश्वर तालुक्यात मंगळवारी सकाळपासूनही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे ओढे ओसंडून वाहत आहेत. यामुळे नागरिकांसह जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे. असे असतानाच मंगळवारी सकाळच्या सुमारास तालुक्यातील घावरी येथील बबन पांडुरंग कदम (वय ६२) हे वृध्द जनावरांना घेऊन गेले होते. त्यावेळी पावसामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या पाण्यात कदम वाहून गेल्याची प्राथिमक माहिती देण्यात आली आहे. संबंधिताचा पोलिस तसेच ट्रेकर्स शोध घेत आहेत. पण, पावसामुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे सायंकाळपर्यंततरी कदम यांचा शोध लागला नव्हता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान