शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात सलग पाचव्या दिवशीही वळीव पाऊस, माण तालुक्यात पाणी-पाणी 

By नितीन काळेल | Updated: May 14, 2024 17:29 IST

सातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस पडत असून सलग पाचव्या दिवशीही अनेक ठिकाणी हजेरी लावली. सातारा शहरात तर दुपारच्या सुमारास ...

सातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस पडत असून सलग पाचव्या दिवशीही अनेक ठिकाणी हजेरी लावली. सातारा शहरात तर दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे अंधारून आले होते. त्यानंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. माण तालुक्यातही मंगळवारी दुपारीनंतर चांगला पाऊस पडला. त्यामुळे पाणी-पाणी झाले. जिल्ह्यात आत्तापर्यंत उन्हाळा तापदायक ठरला. संपूर्ण एप्रिल महिना रखरखीत उन्हाचा होता. तर मे महिना आणखी कडक ठरला. यामुळे लोक हैराण झाले होते. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यात जीवाची काहीली होत होती. सातारा शहराचे तापमान ४० अंशावर पोहोचलेले. त्यामुळे उन्हाळी पाऊस कधी सुरू होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच मागील आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आणि वाळवाचा पाऊस पडू लागला. त्यामुळे पाराही खालावला आहे.  शहरात आज, मंगळवारी सलग पाचव्या दिवशी पाऊस पडला. अधिक करून दुपारनंतरच हा पाऊस होत आहे. दुपारी तीन वाजल्यापासून ढग जमण्यास सुरूवात झाली होती. चारच्या सुमारास अंधारून आले.  त्यानंतर पावसाचे थेंब पडू लागले. मात्र, पावणे पाचच्या सुमारास पावसाला जोरदार सुरुवात झाली. तसेच यावेळी वारेही सुटले. मेघगर्जनेसह पाऊस पडू लागला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला. यामुळे वातावरणातील उकाडा आणखी कमी होण्यास मदत झाली.सातारा अन् वीजपुरवठा खंडित समीकरण..सातारा शहरात मागील काही दिवसापासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. वारंवार वीज जात आहे. त्यामुळे महावितरणबद्दल सातारकरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर मंगळवारीही दुपारपासून अनेक भागातील वीज गेली होती. पाऊस उघडल्यानंतरही वीज आली नव्हती. त्यामुळे महावितरणबद्दल नागरिकांचा रोष आणखीन वाढला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसman-acमाण