शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस; कोयना, उरमोडी, वीर, कण्हेर धरणाचे दरवाजे उघडले

By दीपक शिंदे | Updated: July 25, 2024 12:39 IST

कोयना धरणातून एकूण ११ हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात येणार

सातारा : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सततच्या पावसामुळे ओढ्यांसह नद्यांनाही पूर आला असून काही ठिकाणी रस्त्यावरच झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. कोयना, वीर, निरा, उरमोडी या धरणात पाणी येण्याचा ओघ अधिक असल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे. जिल्ह्यातील कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी ४ वाजता. धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तर पायथा गृहामधून १०५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे एकूण ११ हजार ५० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.कण्हेर धरणातून ५ हजार क्युसेक पाणी वेण्णा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे म्हसवे पूल - करंजेकडून म्हसवे जाणारा तसेच हमदाबाज पूल हमदाबाज कडून किडगावकडे जाणारा या रस्त्यावरुन प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.बोगदा ते परळी रस्त्यावर भोंदवडे गावाजवळ रस्त्यावरच मोठे झाड पडल्याने काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. प्रशासनाने तातडीने दखल घेत झाड बाजूला केल्यानंतर सुमारे एक तासाने वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणTrafficवाहतूक कोंडी