शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: २१ दिवसातील पाऊस; एक आठवड्यात, नवजा, महाबळेश्वरचा पाऊस तीन हजार मिलीमीटरजवळ

By नितीन काळेल | Updated: July 24, 2023 19:23 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवांधार पाऊस सुरु असून नवजा आणि महाबळेश्वरचे पर्जन्यमान तीन हजार मिलीमीटरच्या उंबरठ्यावर आले आहे. ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवांधार पाऊस सुरु असून नवजा आणि महाबळेश्वरचे पर्जन्यमान तीन हजार मिलीमीटरच्या उंबरठ्यावर आले आहे. तर याच ठिकाणी तीन आठवड्यात जो पाऊस पडला तो या आठवड्यातच झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर लक्षात येत आहे.जिल्ह्यात पाऊस सुरू होऊन एक महिना झाला आहे. २५ जूनला मान्सूनचा पाऊस सक्रीय झाला. पण, पश्चिम भागातच या पावसाने आतापर्यंत चांगली हजेरी लावली आहे. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता. मागील आठवड्यात १७ जुलैपर्यंत नवजा येथे फक्त १५५९ तर महाबळेश्वरला १५१७ मिलीमीटर पर्जन्यमान झाले होते. पण, गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला. पहिल्या तीन आठवड्यात पाऊस झाला त्याच्या जवळपास दुप्पट अवघ्या आठवड्यात झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत नवजा येथे २९२२ आणि महाबळेश्वरला २८३६ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. सततचा पाऊस आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून दरडप्रवण भागातील ४८९ कुटुंबांना आतापर्यंत स्थलांतरित करण्यात आले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान