शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस, महाबळेश्वरमध्ये 'इतक्या' मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद 

By नितीन काळेल | Updated: June 27, 2023 12:45 IST

कोयना धरणात पाण्याची आवक सुरू 

सातारा : जिल्ह्यात उशिरा का असेना मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली असून पश्चिमेकडे दमदार सुरुवात आहे. त्यामुळे काेयना धरणात आवक सुरू झाली असून पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होऊ लागली आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत ४०५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली असून पूर्वेकडे मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.चक्रीवादळामुळे यंदा पाऊस लांबणीवर पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागून राहिलेली. असे असतानाच तीन दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. पूर्व तसेच पश्चिम भागात हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढे, नाले वाहू लागल्याने धरणांत पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यातच मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला २६ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला ३६ आणि महाबळेश्वरला सर्वाधिक ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पश्चिम भागात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी भात लागण तसेच पेरणीचीही तयारी केली आहे. साताऱ्यात जोरदार पाऊस...सातारा शहरासह परिसरात चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. कधी ऊन तर कधी पाऊस अशीही स्थिती असते. सोमवारी पावसाची बऱ्यापैकी उघडीप होती. मात्र, मंगळवारी सकाळी साडे आकराच्या सुमारास सातारा शहरात जोरदार पाऊस झाला. यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लाेट वाहिले. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालेले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानRainपाऊस