शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Satara News: कोयना, नवजा धरण परिसरात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात वाढ, महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस

By नितीन काळेल | Updated: June 29, 2023 12:12 IST

खरीप पेरण्यांना वेग

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजाला पाच दिवसांपासून पाऊस सुरू असून महाबळेश्वरला २४ तासांत ११८ मिलीमीटरची पर्जन्यमानाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. तर पूर्व भागात खरीप हंगामातील पेरणीसाठी पावसाची आवश्यकता आहे.जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. पण, यंदा मान्सून येण्यास उशिर लागला. तर २४ जूननंतरचा मान्सूनचा पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडू लागलाय. विशेषत: करुन पश्चिम भागातील कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेबश्वरसह कांदाटी खोऱ्यात सतत पाऊस पडत आहे. यामुळे ओढे, नाले भरुन वाहत आहेत. तसेच भात खाचरे भरुन पाणी वाहत आहे. तर पश्चिम भागातीलच कोयना, धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडी आदी प्रमुख धरण परिसरातही पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठाही हळूहळू वाढू लागला आहे.गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ११८ मिलीमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून ५९५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर काेयनानगर येथे सकाळपर्यंत ४९ आणि नवजाला ७४ मिलीमीटर पाऊस पडला. जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे फक्त ३२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तरीही धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने कोयनेत पाण्याची आवक बऱ्यापैकी होत आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढू लागलाय. तर गुरुवारी सकाळच्या सुमारास धरणात ११.१६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असलातरी पूर्वेकडे उघडझाप सुरू आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातील खरीप पेरण्यांना वेग येण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. सध्या येथील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान