शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली, पत्रे उडाले; सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात 

By नितीन काळेल | Updated: May 17, 2024 18:38 IST

अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती

सातारा : जिल्ह्यात वादळासह वळीवाचा पाऊस होत असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. मागील दीड महिन्यात पाऊस आणि वादळामुळे ११४ घरांचे नुकसान झाले आहे तर ४ शाळांनाही फटका बसलाय. कोंबड्यांसह पशुधनही मृत झाले आहे. यामुळे दीड महिन्यात पाऊस आणि वाऱ्यामुळे अंदाजित ४७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात आहे.दरवर्षीच उन्हाळ्यात वळीवाचा पाऊस होतो. जोरदार वादळी वारेही वाहतात. त्यातच विजाही कोसळतात. जिल्ह्यात सध्या वळीवाचा पाऊस पडू लागला आहे. त्याचबरोबर जोरदार वारेही सुटत आहे. यामुळे नुकसानाच्या घटना घडू लागल्या आहेत. मागील आठवड्यात तर पावसाचा पाटण आणि कऱ्हाड तालुक्याला मोठा फटका बसला. यामध्ये नुकसानच अधिक झाले आहे. पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळामुळे अनेक गावांत नुकसान झाले. काळगाव परिसरात घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य भिजले. तर एका ठिकाणी कारवरही झाड पडले. यामुळे वाहनाचे नुकसान झाले. तालुक्यातील मालदन, तळमावले, गलमेवाडी, मानेगाव येथे मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती. वीज वाहिन्यावरही झाडे पडली. यामुळे वीजपुरवठा खंडित हाेण्याबरोबरच महावितरणचे नुकसान झाले. सोमवारी तर कऱ्हाड तालुक्यातील मसूर परिसरात वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. तर विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. या पावसामुळे आडसाली उसासह फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.जिल्ह्यात मागील आठवड्यापासून दररोज कोठे ना कोठे पाऊस पडत आहे. याचा फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक झाला आहे. घरांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर फळबागांना मोठा फटका बसत आहे. वीज पडण्यानेही आठवड्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १ एप्रिलपासून १५ मेपर्यंत पाऊस आणि वादळाने ४७ लाख १२ हजार रुपयांचे अंदाजित नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

जनावरांच्या गोठ्यांनाही फटका..जिल्ह्यात मागील दीड महिन्यात पाऊस तसेच वादळाने शेती पिके तसेच शेतजमिनीचे नुकसान झाल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. पण ९ घरांचे पत्रे उडून अंशत: नुकसान झाले आहे तर ३ गोठे आणि शेडलाही वादळाचा फटका बसलाय. त्याचबरोबर १०५ घरे, जिल्हा परिषदेच्या ४ शाळा, एका वाहनाचे नुकसान झाले. तसेच १० कोंबड्या, ६ जनावरेही मृत झाली आहेत. तर दोन महिन्यांत वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस