रस्त्याच्या कारणावरून जोरदार मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST2021-05-30T04:30:20+5:302021-05-30T04:30:20+5:30

मल्हारपेठ येथील जयदीप मधुकर चव्हाण, यशोदीप चव्हाण, अंकुश चव्हाण, कलावती चव्हाण आणि नाडे-क्रांतीनगर येथील महिपती भिसे, महेश भिसे, वैभव ...

Heavy fighting for road reasons | रस्त्याच्या कारणावरून जोरदार मारामारी

रस्त्याच्या कारणावरून जोरदार मारामारी

मल्हारपेठ येथील जयदीप मधुकर चव्हाण, यशोदीप चव्हाण, अंकुश चव्हाण, कलावती चव्हाण आणि नाडे-क्रांतीनगर येथील महिपती भिसे, महेश भिसे, वैभव भिसे, अनुसया भिल्ल व मालन चव्हाण (रा. मल्हापेठ) यांच्यात रस्त्याच्या वादावरून गुरुवारी, दि. २७ सायंकाळी जोरदार मारामारी झाली. हातोडा, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने झालेल्या मारहाणीत दोन्हीकडील पाच जण जखमी झाले आहेत.

याबाबत जयदीप मधुकर चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मालन नाना चव्हाण, महेश महिपती भिसे, अनुसया महिपती भिसे, महिपती भिसे, वैभव महिपती भिसे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यालउट महेश महिपती भिसे (वय ३३) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, जयदीप चव्हाण, त्याचा भाऊ व अन्य काही जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील तपास करत आहेत.

Web Title: Heavy fighting for road reasons