सातारा : मानसिक ताणतणाव, विविध कारणे, चिंतांमुळे सर्वच वयोगटातील नागरिकांना ग्रासले आहे. निरोगी जीवनासाठी निरोगी हृदय असणे आवश्यक आहे. त्यासाठीचे उपचार द हार्ट क्लिनिकच्या माध्यमातून सातारकरांना उपलब्ध झाले आहेत. हे क्लिनिक सातारकरांना निरोगी जीवनासाठी वरदान ठरेल,’ असे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
येथील सदर बझारमधील चिनार प्लाझामध्ये डॉ. भूषण भरत पाटील यांनी सुरू केलेल्या द हार्ट क्लिनिकचे उद्घाटन गृहराज्यमंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. भूषण पाटील, डॉ. विकास पाटील, अॅड. भरत पाटील, अॅड. शकुंतला पाटील, डॉ. सई पाटील, डॉ. भास्कर यादव, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. भूषण पाटील यांनी सातारा हीच कर्मभूमी ठरवत सदर बझारमध्ये द हार्ट क्लिनिक सुरू केले आहे. पाटण तालुक्यातील विहे हे त्यांचे मूळ गाव. डॉ. पाटील यांचे शालेय शिक्षण शानभाग विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली. पदवीनंतर औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमडी मेडिसीन ही पदवी मिळविली. बंगळुरू येथील सत्यसाई इन्सिट्यूट ऑफ हायर सायन्सेसमधून डीएनबी कॉर्डीलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर डॉ. पाटील यांनी वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. आतापर्यंत त्यांनी अडीच हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. यामध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, डिव्हाईस क्लोजर, इतर कार्डिओलॉजीकल इंटरव्हेन्शन्स आदी उपचारांचा समावेश आहे.
डॉ. पाटील यांनी यानंतर सातारकरांना सेवा देण्याचा निर्णय घेत सदरबझारमधील जुना आरटीओ रोडवरील चिनार प्लाझा येथे हे क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानुसार हे क्लिनिक सातारकरांसाठी सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. (वा.प्र)
फोटो ओळ : सातारा येथे द हार्ट क्लिनिकचे उद्घाटन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. भूषण पाटील, अॅड. भरत पाटील, डॉ. सई पाटील, डॉ. विकास पाटील, डॉ. भास्कर यादव आदी उपस्थित होते.
......................................................................