सातारा : झाडानी (ता. महाबळेश्वर) येथील जमीन प्रकरणी अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यासमोर सुरू असलेली सुनावणी पूर्ण झाली असून, यासंदर्भातील अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.‘सह्याद्री वाचवा’ मोहिमेंतर्गत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी व त्यांच्या नातेवाइकांच्या विरोधात झाडानी गावात कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती. या प्रकरणात २६ नोव्हेंबर व १५ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली.
वाचा - गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाबळेश्वरमधील संपूर्ण गावच खरेदी केले१५ डिसेंबर रोजी झालेल्या अंतिम सुनावणीस वळवी, त्यांचे कुटुंबीय तसेच तक्रारदार सुशांत मोरे उपस्थित होते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अपर जिल्हाधिकारी माने यांनी सुनावणी पूर्ण झाल्याचे जाहीर करत प्रकरणाचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
Web Summary : The hearing regarding the Zhadani land case in Mahabaleshwar, involving allegations against GST Commissioner Chandrakant Walvi, has concluded. The Additional Collector will submit a detailed report to the government after hearing both sides.
Web Summary : महाबलेश्वर के झाड़नी भूमि मामले में जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी के खिलाफ आरोपों पर सुनवाई पूरी हो गई है। अपर जिलाधिकारी दोनों पक्षों को सुनने के बाद सरकार को विस्तृत रिपोर्ट सौंपेंगे।