शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मराठ्यांच्या लेकरांपेक्षा प्रकृती महत्त्वाची नाही, कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच - मनोज जरांगे-पाटील 

By दीपक देशमुख | Updated: August 11, 2024 15:08 IST

Manoj Jarange Patil : सातारा येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून प्रकृती स्थीर असल्याची माहिती देत पुढील नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली.

सातारा : मराठा समाजाच्या लेकरांपेक्षा माझी तब्येत महत्त्वाची नाही. पुढील सर्व नियोजित रॅली, सभा ठरल्यापुसार पार पडतील. जिथे रॅली असेल तिथे मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले. दरम्यान, त्यांनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नितेश राणे तसेच आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.

सातारा येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून प्रकृती स्थीर असल्याची माहिती देत पुढील नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली. नितेश राणे यांनी आधुनिक मोहम्मद जीना असल्याचे तसेच दाढीवर आक्षेप घेतला असल्याचे विचारताच जरांगे-पाटील म्हणाले, त्यांनी सर्वच दाढी राखणाऱ्यांवर आक्षेप घेतला असेल. दाढी राखणं हे मर्दाचे लक्षण आहे. त्यांचा सन्मान करतो, परंतु, सन्मान शब्दाचा अर्थ त्यांना कळत नाही. ते बोलतात, पण शब्द फडणवीस यांचे आहेत. फडणवीस हे मराठ्यांच्या अंगावर मराठ्यांना सोडत आहेत.

जरांगे यांच्या आडून शरद पवार राजकारण खेळत असून दंगलीची शक्यता राज ठाकरे यांनी वर्तवली असल्याबाबत जरांगे-पाटील म्हणाले, त्यांनी वर्तवली म्हणून थोडीच दंगल होणार आहे ? गाड्या-फोडणाऱ्यांच्या विचारांनी राज्य चालत नाही. कोठेही दंगली होणार नाहीत. राज ठाकरे यांना आरक्षणाची गरज नसेल परंतु, गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. एअर कंडिशनमध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत कळणार नाही. त्यांनी मराठा युवकांनाच विचारावं की आरक्षणाची गरज आहे की नाही. प्रत्येकवेळी तुमचे विचार जनतेवर लादू नका.

महेश शिदे यांची टीव्ही त्यावेळी जळली असेलबारामतीकरांचे सरकार होते, तेव्हापासून तीन वर्षे तुम्ही झोपेत होता अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी केल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता जरांगे-पाटील म्हणाले, त्यावेळी महेश शिंदे यांची टीव्ही जळली असेल, त्यामुळे कदाचित त्यांना माहित नसेल. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यावेळीही सध्याच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त फजिती केली होती. त्यांना जातीपेक्षा पक्ष मोठा वाटतो. पण जेव्हा निवडणुकीत पडतील, तेव्हा जातीची किंमत कळेल. जितके मराठ्यांच्या मागे लागेल तितका त्रास होईल, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.

जरांगे-पाटील म्हणाले...- पहिल्या दिवसांपासून ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. मराठा पूर्वीपासून ओबीसीत आहे.- अजित पवार वर्ष झाले तरी आरक्षणावर तोडगा काढताहेत. तुमच्या हातातच सत्ता.- शिवेंद्रराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे वंशज, त्यांच्याविरोधात उमेदवार नसेल.- ११३ आमदार पाडणार पण नेमके कोण हे आताच सांगणार नाही.- प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत नेहमीच आदर आहे. त्यांनी जनभावना लक्षात घ्यावी.- सगेसोयऱ्यांना आरक्षणासाठी कायद्यात दुरुस्तीची अधिसुचना, तातडीने अंमलबजावणी व्हावी.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSatara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षण