शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका, शिक्षिकेला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:49 IST

शाळेतील विद्यार्थ्याला हीन वागणूक देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी निर्मला कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका व वर्ग शिक्षिकेला जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिने साधी कैद व पंधराशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट जॉन व वर्गशिक्षिका रुझारिया गेब्रिरील सिल्वेरा (रोझा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देजातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका, शिक्षिकेला शिक्षासातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : शाळेतील विद्यार्थ्याला हीन वागणूक देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी निर्मला कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका व वर्ग शिक्षिकेला जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिने साधी कैद व पंधराशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट जॉन व वर्गशिक्षिका रुझारिया गेब्रिरील सिल्वेरा (रोझा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, तृप्ती सुशील कंठ यांचा मुलगा रुद्राय हा निर्मला कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेत होता. त्यावेळी मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट जॉन व वर्गशिक्षिका रुझारिया गेब्रिरील सिल्वेरा (रोझा) यांनी रुद्राय याला तू झोपडपट्टीमध्ये राहतोस. तुझी या शाळेत शिक्षण घेण्याची लायकी नाही. तुझ्या लायकीच्या झोपडपट्टीच्या शाळा शोध, असे सांगत होत्या. तसेच वर्गामध्ये बाकावर न बसविता खाली जमिनीवर बसवितात. त्याचबरोबर वर्गाबाहेर काढले जाते. याबाबत पालकांनी शाळा प्रशासनासोबत बोलणी केली असता प्रशासनाने जातिवाचक शिवीगाळ केली.याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील एम. यू. शिंदे यांनी सरकारी बाजू मांडली.सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे आणि फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश (एक) ए. ए. जे. खान यांनी मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट जॉन व वर्गशिक्षिका रुझारिया गेब्रिरील सिल्वेरा (रोझा) यांना दोषी ठरवले. त्यांना सहा महिने साधी कैद व पंधराशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पोलीस प्रोसिक्युशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कबुले, राजेंद्र भूतकर, उर्मिला घाडगे, अविनाश पवार, रवी जाधव, अजित शिंदे, क्रांती निकम यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयSatara areaसातारा परिसर