शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील 'हे' गाव बनले राज्यातील पहिले ‘गो ग्रीन व्हिलेज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 16:53 IST

ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आता राज्यातील पहिले ‘गो ग्रीन व्हिलेज’ ठरले आहे. गावातील वीजग्राहकांनी वीज बिले ईमेलद्वारे स्वीकारण्याचा ...

ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आता राज्यातील पहिले ‘गो ग्रीन व्हिलेज’ ठरले आहे. गावातील वीजग्राहकांनी वीज बिले ईमेलद्वारे स्वीकारण्याचा उपक्रम राबविला आहे. बिलांच्या कागदासाठी होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी मान्याचीवाडीने एक पाऊल पुढे टाकल्याने महावितरण कंपनीकडूनही गावकऱ्यांचे कौतुक होत आहे. यामुळे ग्राहकांनाही प्रत्येक बिलात सूट मिळणार आहे.ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. वसुंधरा, जैवविविधता यांचे संवर्धन आणि संगोपन करीत वृक्षसंवर्धन करण्यासाठी गावात बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच रवींद्र माने यांनी गावकऱ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

यामध्ये वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या लाभाची आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘गो ग्रीन’ योजना आणल्याचे गावकऱ्यांना सांगून त्यामुळे ग्राहकांना होणारा लाभ आणि बिलासाठी लागणाऱ्या कागदाची होणारी बचत याबाबत लोकांमध्ये जागृती केली. त्यानुसार गावातील १२० वीजग्राहकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेत एकमुखी संपूर्ण गावच गो ग्रीन करण्यावर शिक्कामोर्तब केले.ग्रामपंचायतीच्या सेवा सरकार केंद्रामध्ये सर्व वीजग्राहकांची गो ग्रीन योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी केली. प्रत्येक ग्राहकाच्या बिलासाठी ग्रामपंचायतीचा मेलआयडी देण्यात आला. गावातील सर्वच्या सर्व १२० ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदविला. त्यामुळे मान्याचीवाडी गाव योजनेत शंभर टक्के नोंदणी केलेले राज्यातील पहिले ‘गो ग्रीन व्हिलेज’ ठरले आहे. यासाठी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता आर. एस. बुंदेले, उप अभियंता ए. ए. आदमाने, शाखा अभियंता डी. एम. शेडे यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्यात सुमारे अठ्ठावीस लाख ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी वीजग्राहक आहेत. वीज बिले छपाईसाठी दरमहा हजारो टन पेपर लागतो. यासाठी मोठी वृक्षतोड होते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. यावर ग्राहकांनीच निर्बंध घातले तर पर्यावरण संवर्धन तर होईलच; पण ग्राहकांनाही लाभ मिळेल. यासाठी प्रबोधन गरजेचे आहे.  - रवींद्र माने, सरपंच मान्याचीवाडी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर