शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पिकांचे नुकसान; परतीच्या पावसाचा कहर, साताऱ्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:48 IST

satara, rain, Mahabaleshwar Hill Station सातारा जिल्ह्यात शनिवारपासून परतीचा पाऊस सुरू असून पाचव्या दिवशी तर कहर झाला. सातारा शहरात सकाळपासून संततधार होती. तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रिमझिम तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले. तर या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच २४ तासांत पाटण तालुक्यात १६१ मिलिमीटर पाऊस झाला.

ठळक मुद्दे पिकांचे नुकसान; परतीच्या पावसाचा कहर, साताऱ्यात संततधार पाटणला १६१ मिलिमीटर पाऊस, नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल

सातारा : जिल्ह्यात शनिवारपासून परतीचा पाऊस सुरू असून पाचव्या दिवशी तर कहर झाला. सातारा शहरात सकाळपासून संततधार होती. तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रिमझिम तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेहीमुश्किल झाले. तर या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच २४ तासांत पाटण तालुक्यात १६१ मिलिमीटर पाऊस झाला.जिल्ह्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला. सप्टेंबरमधील पावसाने तर सर्व मोठी धरणे भरली. तर सध्या परतीच्या पावसाचा जिल्ह्यात धुमाकूळ सुरू आहे. शनिवारपासून हा पाऊस पडत आहे. पहिल्या दिवशी कऱ्हाड , कोरेगाव, माण, फलटण, वाई, खंडाळा अशा सर्वच तालुक्यात दमदार पाऊस झाला. तर रविवारी काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सोमवारी जिल्ह्यात पाऊस पडला. पण, म्हणावा असा जोर नव्हता. मात्र, मंगळवारपासून परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. साताºयासह दुष्काळी भागातही पाऊस कोसळू लागलाय. पश्चिम भागातील कोयनानगर, नवजा, कास, बामणोली आणि महाबळेश्वर परिसरातही पाऊस पडत आहे.जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून पाऊस पडत आहे. या पावसाचा जोर वाढू लागलाय. सातारा शहरात तर सकाळपासूनच संततधार सुरू होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झालेले. तर ग्रामीण भागातही रिमझिम तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. काही ठिकाणी तर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीच्या कामांना फटका बसला आहे. तसेच खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, भुईमूग पिकांना चांगलाच फटका बसलाय. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. सततच्या या पावसामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यात ५१० मिलिमीटर पाऊस; सातारा, पाटणला अधिक नोंद...जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरूच असून बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ऐकूण ५१०.१० मिलिमीटर पाऊस पडला. तर सरासरी ५.६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सकाळी ८ पर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे. सातारा - १०५.६०, जावळी -२९.२०, पाटण - १६१, कऱ्हाड - ९५, कोरेगाव - ३३, खटाव - ३०.७०, माण - ६, फलटण - १२, खंडाळा - ९.४०, वाई - ६ आणि महाबळेश्वर - २२.६० मिलिमीटर.कोयनेचे दरवाजे बंद; पायथा वीजगृहातूनच विसर्ग...जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा अधिक जोर राहिला आहे. तसेच कोयना, नवजा येथे चांगला पाऊस झाला. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयाननगर येथे २३ तर यावर्षी आतापर्यंत ४३८२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे १० आणि यावर्षी जूनपासून ५०९० तसेच महाबळेश्वर येथे सकाळपर्यंत ३ आणि यावर्षी ५०४६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०४.२८ टीएमसी पाणीसाठा होता. धरणाच्या दरवाजातून विसर्ग बंद करण्यात आलेला. तर पायथा वीजगृहातूनच २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदीत जात आहे.

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान