शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

Satara: पाच इंच लांबीची इशारतीची तोफ पाहिलीय का?, वाईतील इतिहास अभ्यासकाच्या संग्रही तोफ

By सचिन काकडे | Updated: January 15, 2024 17:40 IST

कोल्हापूर येथे कामानिमित्त गेले असता त्यांना एका कुटुंबाकडे ही तोफ आढळून आली

सचिन काकडेसातार : वाईत राहणारे इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी शिवकालीन शस्त्रास्त्रांचा संग्रह करण्याचा छंद जोपासला असून, त्यांच्या शस्त्र संग्रहात नुकतीच एक इशारतीची तोफ दाखल झाली आहे. लांबी पाच इंच, अत्यंत सुंदर नक्षीकाम व ब्रांझ धातूपासून घडविण्यात आलेली ही तोफ १८व्या शतकातील आहे.प्रसाद बनकर यांनी २२ वर्षांपासून शस्त्रास्त्रांचा संग्रह व त्यांचे संवर्धन करण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्या संग्रहात शिवकालीन तलवार, भाले, बरचे, वाघनखे, बिचवा, दांडपट्टे , मराठा धोप तलवार, चिलानम, ढाल व ढालीचे विविध प्रकार, ब्रिटिशकालीन तलवारी, बंदुका, बारूददान यांसह १४व्या आणि १५व्या शतकातील हजारो शस्त्रे आहेत. विविध धातूपासून बनविण्यात आलेल्या देवी देवतांच्या मूर्ती, दुर्मीळ दिवे, १२ हजारांपेक्षा जास्त जुन्या नाण्यांचा संग्रहदेखील त्यांनी केला आहे.त्यांच्या संग्रहात १० ईशारतीच्या तोफा असून, नुकतीच एक तोफ त्यांच्या संग्रहात दाखल झाली आहे. कोल्हापूर येथे कामानिमित्त गेले असता त्यांना एका कुटुंबाकडे ही तोफ आढळून आली. या तोफेचे महत्व जेव्हा त्या कुटुंबीयांना सांगण्यात आले तेव्हा त्यांनी ही तोफ जतनीकरणासाठी बनकर यांना देऊ केली. केवळ ५ इंच लांबीची ही तोफ त्यांच्या संग्रहातील सर्वांत लहान तोफ आहे.

..यासाठी व्हायचा वापरअशा प्रकारच्या तोफा १६व्या शतकापासून १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत पाहायला मिळतात. या तोफा त्या काळातील राजघराणे, सरदार घराणे किंवा मोठ्या व्यक्तींच्या वाड्यात, देवघराबाहेर ठेवल्या जात असत. जत्रेच्या वेळी घरातील देव पालखीमध्ये बसवून पालखी बाहेर येताना अथवा देव वाड्याबाहेर पडले आहेत, याची इशारत देण्यासाठी या तोफेमध्ये गुलाल भरून व दारूगोळा भरून बत्ती दिली जायची. म्हणूनच अशा तोफांना ‘ईशारतीच्या तोफा’ हे नाव दिले गेले असावे, असा कयास इतिहास अभ्यासकांकडून बांधला जात आहे.

..अशी आहे तोफ

  • ओतीव प्रकार
  • कालखंड १८वे शतक
  • ब्रांझ धातूपासून घडण
  • लांबी ५ इंच
  • तोफेच्या तोंडाचा व्यास १.५ इंच
  • वजन ५८० ग्रॅम

इशारतीच्या तोफांच्या नळकांड्याची (बॅरल) लांबी ५ इंचापासून २४ इंचापर्यंत पाहण्यास मिळते. या प्रकारच्या तोफांवर सुंदर नक्षीकामदेखील आढळते. अशा तोफा पोलाद, पितळ, ब्रांझ किंवा पंचधातूपासून बनवण्यात येतात. गेली वीस वर्षे या शस्त्रांच्या माध्यमातून छत्रपती शिवराय, विविध सरदार तसेच आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपुढे मांडण्याचा प्रत्यन मी करत आहे. - प्रसाद बनकर, आजीव सदस्य, भारत इतिहास संशोधक मंडळ 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर