शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

हापूस हंगाम उरला आठवडाभरच....

By admin | Updated: May 25, 2014 00:33 IST

दर कमी : एकाच दिवशी पावणेतीन लाख पेट्यांनी कोसळला हापूसचा दर

 प्रकाश वराडकर, रत्नागिरी : अवघ्या काही दिवसात कोकण, मुंबईसह राज्यभरात स्वस्ताईचा झिम्मा खेळणारा हापूस यंदाच्या हंगामाचा या आठवड्यातच निरोप घेणार आहे. येत्या ५ ते ६ दिवसांत हापूस हंगाम संपणार आहे. यंदा मुंबईत लोकसभा निवडणूक २४ एप्रिलला झाल्यानंतरच्या सुटीमुळे २८ एप्रिलला साचलेला २ लाख ६७ हजार पेट्या हापूस एकदम वाशी बाजारात दाखल झाला. एवढा हापूस विकण्याची वाशी मार्केटची क्षमता नसल्यानेच हापूसचा भाव कोसळला, असे मत प्रसिध्द आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. गेल्या चार वर्षांपासून कोकणातील हापूसवर या ना त्या कारणाने संकटे येत आहेत. त्याचा परिणाम हापूसचे दर कोसळण्यात होत आहे. २०११ साली वाहतूक व्यावसायिकांचा संप, २०१२ साली माथाडी कामगारांचा संप, २०१३ साली एलबीटीचा प्रश्न व यंदा हापूस पीक कमी असूनही अचानकपणे वाढलेल्या तापमानाने हापूस एकाचवेळी तयार झाला व भाव कोसळले. रत्नागिरी जिल्ह्यात नाखरे येथे १६, १७ एप्रिलला चक्रीवात निर्माण होऊन झालेले नुकसान व त्यानंतर पुन्हा उत्तर रत्नागिरीत वादळाचा तडाखा बसून झालेले नुकसान यामुळे धास्तावलेल्या आंबा बागायतदारांमध्ये हापूसची लवकर काढणी करून तो बाजारपेठेत पाठविण्याची स्पर्धा लागली. कोकणात यंदा मूळातच हापूस पीक ३० टक्केपर्यंत म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत कमी होते. २० एप्रिल २०१४ ते १० मे २०१४ या २० दिवसांच्या काळात त्यातील २० टक्के हापूस बाजारात आला. मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने हापूसचे दर घसरले व हापूस बागायतदारांचे नुकसान झाले. आता काही टक्के उरलेला हापूस बाजारात जात असून हजार ते १२०० रुपये पेटीचा दर आहे. येत्या आठवड्यात हापूस हंगाम खर्‍या अर्थाने संपेल. त्यानंतर किरकोळ स्वरुपात हापूस बाजारात असू शकेल, असे डॉ. भिडे म्हणाले. पोलिसांकडून लूट... वाशी बाजारात हापूसचे दर कोसळल्यानंतर जिल्ह्यातील काही आंबा बागायतदार व व्यापार्‍यांनी मुंबईत थेट हापूस नेऊन विकण्याचे तंत्र अवलंबिले. मात्र वाशी पूल नाका येथे मुंबईला जाणार्‍या हापूस वाहतूकदारांकडून तब्बल हजार ते दीड हजार रुपये पोलिसांकडून उकळण्यात येत असल्याच्या वाहतूकदारांच्या तक्रारी आहेत. पुण्याला थेट जाणार्‍या हापूस वाहनांना कात्रज येथे अडवून पैसे घेतले जात होते. मात्र डॉ. भिडे यांनी सचिवालयापर्यंत हा प्रश्न नेल्याने ही लूट थांबली.