शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

केसांचा फुगा.. सगळे बघतायत टकामका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:27 IST

योगेश घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अलीकडे क्रिकेट सामने झाले. यामध्ये विराट कोहलीने आपल्या स्टाईलमध्ये बदल करत दाढी ठेवली तर हार्दिक पंड्यानं चक्क आपले केस उभे केले, याचे अनुकरण आख्ख्या टीमनं करू पाहिलं.. त्यानंतर हळूहळू देशातील युवा पिढीमध्ये केस आणि दाढी वाढवून विविध प्रकारचे कट मारण्याची के्रझ वाढत गेली. पूर्वी ...

योगेश घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अलीकडे क्रिकेट सामने झाले. यामध्ये विराट कोहलीने आपल्या स्टाईलमध्ये बदल करत दाढी ठेवली तर हार्दिक पंड्यानं चक्क आपले केस उभे केले, याचे अनुकरण आख्ख्या टीमनं करू पाहिलं.. त्यानंतर हळूहळू देशातील युवा पिढीमध्ये केस आणि दाढी वाढवून विविध प्रकारचे कट मारण्याची के्रझ वाढत गेली. पूर्वी चित्रपट पाहून समाज त्याचे अनुकरण करत होता. मात्र, आता खेळाडूंना पाहून समाज त्याचे अनुकरण करत आहे. जसा काळ बदल गेला तसा वेशभूषा अन् हेअर कट करण्याची नवनवीन पद्धत रुढ होत गेली.काही दिवसांपूर्वी आयपीएलचे सामने झाले. तसेच सध्या फूटबॉलचा हंगाम सुरू आहे. यातील खेळाडूंच्या हेअर स्टाईलचे अनुकरण युवापिढी करत आहे. सध्या नवीन हेअर स्टाईलमध्ये वनसाईड कट हा स्टाईल फेमस आला आहे. ही स्टाईल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात रुजली गेली आहे. आयपीएलमध्ये जो खेळाडू चमकला किवा त्याने मॅच जिंकून दिली, त्या खेळाडूवर युवा क्रिकेटप्रेमी अतोनात पे्रम करत. तसेच त्याचे कपडे, हेअर स्टाईलचे अनुकरण करत. या खेळाडूंमध्ये विराट कोहली, हार्दिक पंड्या तसेच वेस्ट इंडिजच्या संघामधील ब्रावो, आंद्रे रसल या खेळाडूंची हेअर स्टाईलही वनसाईड होती.१९८० दशकामध्ये हिप्पी केसांची स्टाईलही प्रथम प्रसिद्ध अभिनेता राजेश खन्ना यांनी आणली. त्यानंतर अभिताब बच्चन, मिथून चक्रवर्ती यांनी ही स्टाईल पुढे रुजवली. त्या काळच्या युवा वर्गाने हीच स्टाईल उचलली. मात्र, कालांतराने ही स्टाईल कमी होत गेली आणि शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण यांच्या हेअर स्टाईल आल्या. तिही स्टाईल युवा वर्गाने वापरात आणली.हिप्पी स्टाईल ही केली की कानावर केसं येत असत. हिप्पी स्टाईल करण्यासाठी केसं दाट असावी लागतात. ही स्टाईल करताना केसं थोडीशी कमी करावी लागतात. त्यामुळे ही स्टाईल उठावदार दिसते. जसा काळ बदलत गेला तशी हेअर स्टाईलही बदलत गेली. सेलिबे्रटी हेअर स्टाईल करतात. तीच हेअर स्टाईल युवा वर्ग करत आहे. सध्या वनसाईडची के्रझ आहे. ही स्टाईल खेळाडू यांच्यापासून आली असून, स्टाईलमध्ये वेगवेगळी डिझाईन केली जात आहे. ही स्टाईल करताना हाताचे काम कमी झाले आहे. युवामध्ये सध्या वनसाईड स्टाईलची मोठी क्रेझ आहे.सध्या दाढीच्या स्टाईलची के्रझआता हेअरबरोबर दाढीची स्टाईलही बदलल्याने वारंवार दाढी करावी लागते. काहीजण दाढी वाढवत आहेत; पण ही दाढी चेहऱ्याला शोभावी, त्यामुळे कोरण्याची स्टाईल आली आहे. दाढी करण्यासाठी सात ते दहा मिनिटे लागतात. मात्र दाढी कोरण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात.