शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांसाठी गाड्या घालताहेत हेलपाटे

By admin | Updated: March 9, 2015 23:48 IST

पाटण तालुका : अधिकाऱ्यांना करमेना, मुक्काम कऱ्हाड, साताऱ्यात

पाटण : पाटणला राहायचे मग पाच आकडी पगार असून, काय कामाचा? या मानसिकतेमुळे पाटण तालुक्यात विविध खात्यांचा कार्यभार पाहणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी कामाची वेळ संपली की कऱ्हाड, सातारा ऐवढेच नव्हे तर पुण्याकडे मुक्कामाला जाताना दिसतात, अशा अधिकाऱ्यांना ने-आण करण्यासाठी शासनाची गाडी आणि चालक हेलपाटे घालताना दिसतात.पाटण तालुका दुर्गम डोंगराळ, येथे वास्तव्यास राहायचे म्हणजे भौतिक, सुख, सुविधांची वानवा, हायफाय, राहणीमानाचा उपभोग घेता येत नाही. तालुक्यात कार्यरत असणारे अधिकाऱ्यांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी पाटणमध्ये मुक्काम करतात. त्यांनादेखील कधी जोडून सुटीचा दिवस उजाडतोय, अशी गडबड असते. मात्र, रोज ये-जा करून पाटण तालुक्यात ड्यूटी करणारे अपडाऊन करताना ७० ते १०० किलोमीटरचा प्रवास करतात. शासनाची गाडी असल्यामुळे प्रवास खर्चाचा बोजा स्वत:वर येण्याचा प्रश्न उरत नाही. अशा अपडाऊनमुळे फटका बसतोय तो सर्वसामान्य जनतेला. कारण रोज ७० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता दिवसभरटिकून राहीलच, याची शाश्वतीे नसते.पाटण तालुक्यात अजूनही बऱ्याच शासकीय कार्यालयात बायोमॅट्रिक यंत्राची हजेरी लागू नाही आणि असेलच तर संबंधित खातेप्रमुखाला त्याच्या लेट उपस्थितीबाबत कोण विचारणार? (प्रतिनिधी)घरी जायचे म्हणून पळवाटशासकीय कार्यालयातील कामकाजाची वेळ संपण्यासाठी तासाभराचा अवधी बाकी असतानाच बरेच अधिकारी व कर्मचारी काहीतरी कामाचे निमित्त काढून कार्यालय सोडतात, अशा कर्मचाऱ्यांचे दर्शन कऱ्हाडहून येताना बऱ्याचवेळा होते. याबाबत खासगी विचारले असता अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पाटणला नेमणूक म्हटले की, ते अगोदरच नाक मुरडतात. त्यापेक्षा गजबजलेल्या शहरात काम करायला आवडते. पाटणला कुटुंब आणायचं म्हटलं की मुलांच्या शिक्षणाची व त्यांच्या क्लासची अडचण. कारण पाटणला वेगवेगळ्या चॉईसच नाहीत. राहायचे झाले तर प्रशस्त रूम शोधावी लागते, ती मिळत नाही.