शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

बेघरांना शाळेत घेऊन जाण्यासाठी गुरुजी काढतात स्वत:ची कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:26 IST

सचिन काकडेलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने साताºयात दाखल झालेली आणि येथेच रस्त्याच्याकडेला झोपडी टाकून राहणारी कुटुंब सर्वांनीच पाहिली. या कुटुंबात अवखळपणे काळीमिट्टी होऊन खेळणारी मुलं आणि त्यांच्या भवितव्याविषयीची चिंता कधीच कोणालाच पडली नाही. नोकरीच्या निमित्ताने प्रवासादरम्यान एका अवलिया शिक्षकाची नजर त्यांच्यावर पडली आणि ही कळकट्ट कपड्यातली मुलं शालेय गणवेशात ...

सचिन काकडेलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने साताºयात दाखल झालेली आणि येथेच रस्त्याच्याकडेला झोपडी टाकून राहणारी कुटुंब सर्वांनीच पाहिली. या कुटुंबात अवखळपणे काळीमिट्टी होऊन खेळणारी मुलं आणि त्यांच्या भवितव्याविषयीची चिंता कधीच कोणालाच पडली नाही. नोकरीच्या निमित्ताने प्रवासादरम्यान एका अवलिया शिक्षकाची नजर त्यांच्यावर पडली आणि ही कळकट्ट कपड्यातली मुलं शालेय गणवेशात दिसू लागली.या मुलांच्या पालकांची समजूत काढण्यापासून त्यांना आवरून शाळेत पाठविण्यापर्यंतचा प्रवास अवघड असला तरी अशक्य मात्र नक्कीच नव्हता हे ज्ञानेश्वर कांबळे यांनी सिद्ध करून दाखविले.वाठार किरोली येथे राहणारे ज्ञानेश्वर कांबळे नोकरीनिमित्त साताºयात स्थायिक झाले. सध्या ते ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर शाळा क्रमांक दोनमध्ये कार्यरत आहेत. पूर्वी पालिकेच्या सिद्धी विद्यामंदिर शाळा क्रमांक १९ मध्ये ते नोकरी करीत होते. या शाळेत काम करीत असताना ते दररोज वाठार किलोरी ते सातारा ये-जा करीत असत. याचवेळी त्यांना बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात झोपड्या टाकून वास्तव्य करीत असणाºया परप्रांतीय मूर्तीकारांची मुले नजरेस पडली. या मुलांना शिक्षणाचा कोणताही गंध नव्हता. सर्वेक्षणानंतर त्यांना अशी २२ मुले आढळून आली.शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार त्यांनी केला. पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर मुलांचे पलिकेच्या सिद्धी विद्यामंदिरात शिक्षण सुरू झशले. ज्ञानेश्वर कांबळे स्वत: आपल्या गाडीतून विद्यार्थ्यांना शाळेत आणत व पुन्हा घरीही सोडत. मातृभाषा मराठी नसूनही अनेक मुलांना लिहिता, वाचता येऊ लागले.पालिकेच्या ज्ञानवर्धिनी विद्यामंदिरात बदली झाल्यानंतर कांबळे यांनी मे महिन्यात पुन्हा सर्व्हे केला. यावेळी त्यांना मूर्तीकारांची शिक्षणापासून वंचित असलेली २० मुले आढळून आली. या मुलांनाही त्यांनी ज्ञानवर्धिनी विद्यामंदिरात दाखल केले आहे.स्वत:च काढला पासमुलींचा मोफत प्रवास असल्याने उर्वरित आठ विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर कांबळे यांनी स्वखर्चातून एसटीचा पास काढून दिला आहे. मुलांची शिक्षणाप्रती आवड वाढावी व ते दररोज शाळेत यावे हाच या मागचा उद्देश असल्याचे ज्ञानेश्वर कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिक