शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गुरू व्हावा ऐसा भगीरथ... आज शिक्षकदिन --

By admin | Updated: September 5, 2014 00:19 IST

सातारा जिल्ह््यातील अनोख्या गुरूजनांना ‘लोकमत’चा सलाम !

सातारा : पुराणकाळात भगीरथानं पाणी आणलं म्हणे! मात्र शिक्षकरूपी आधुनिक भगीरथानं दुर्गम भागांमध्ये ज्ञानाची गंगा आणली अन् सक्षम आणि सुसंस्कारित पिढी घडविली. यामागे शिक्षकांनी केलेले भगीरथी प्रयत्न कधीच दृष्टिक्षेपात येत नाही. अडचणींवर मात करून आपल्या शाळेचा लौकिक सर्वदूर पोहोचविणाऱ्या शिक्षकांविषयी ‘लोकमत’नं जाणून घेतल्यात त्यांच्या भावना... नंदूरबारच्या शिक्षकाची साताऱ्यात सेवा दत्तात्रय पवार ल्ल कुडाळ नंदूरबार जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात नोकरीनिमित्त १९९७ आलेल्या सुमन गावित यांनी केवळ नोकरी हा उद्देशन न ठेवता जावळीसारख्या दुर्गम भागात ज्ञानदानाचे काम करताना इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. सुमन गावित यांनी आपल्या सेवाकालात शिष्यवृत्तीत पंधरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकवले आहेत. तर वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना आपल्या आदर्श प्रशासनाच्या जोरावर त्यांनी शाळेचा भौतिक दर्जाही सुधारला आहे. जावळीसारख्या दुर्गम भागात वागदरे प्राथमिक शाळेत त्यांनी इंटरनेटचा वापर करून आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने शिक्षण देणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा असल्याचा बहुमान शाळेला मिळाला आहे. याची दखल घेऊन बांधकाम अभियंता रणजित हांडे यांनी शाळेस तीस हजार रुपये किमतीचा प्रोजेक्ट भेट दिला. शैक्षणिक गुणवत्तेला महत्त्व देत असताना डोंगरी भागात सेवा बजावणाऱ्या गावित यंनी निपाणी, मालचौंडी, वागदरे या अतिदुर्गम गावांत ज्ञानदानाचे कार्य केले आहे. विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांनी आपली शाळा अव्वल ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. मुलं घडविण्यासाठी चिखल तुडविला! सचिन काकडे ल्ल सातारा सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाबळेश्वर सध्या शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झाले आहे. हा डोंगराळ भाग पूर्वी शिक्षणापासून थोडा दूरच होता. अशा दुर्गम ठिकाणी जाऊन ज्ञानार्जनाचे काम करून आदर्श विद्यार्थ्यांबरोबरच सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम काही शिक्षकांनी करून दाखविले आहे. अशा शिक्षकांमधील एक असे शिक्षक आहेत की ज्यांनी ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगत प्रसंगी चालत जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिंदेवाडी, ता. माढा येथील सुधाकर शिंदे १९९२ मध्ये महाबळेश्वरसारख्या अतिदुर्गम ठिकाणी गिरिस्थान विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यावेळी या भागात शिक्षणाचा म्हणावा इतका प्रसार झाला नव्हता. शिक्षणाप्रती खेड्यातील लोकांची मानसिकता वेगळी होती. ही मानसिकता बदलण्यासाठी सुधाकर शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत खेडोपाडी जाऊन लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजू लागले. ग्रामीण भागात शाळांची संख्याही वाढू लागली. महाबळेश्वरच्या बाहेर एका गावात भाड्याने खोली घेऊन राहू लागले. पूर्वी एसटी गाड्यांची संख्या मर्यादित होती. पावसाळ्यात तर काही वेळेस गाड्या बंद पडत असत. तर काही वेळेस गाडी येतच नसतं. अशा परिस्थितीतही सुधाकर शिंदे कशाचीही पर्वा न करता मुसळधार पावसातून चालत शाळेला जात आणि विद्यार्थ्यांना शिकवत. पावसाचे अतिप्रमाण पाहता कालांतराने तालुक्यातील शाळांना शासनाने पावसाळी सुट्टी घोषित केली. त्यामुळेच शिंदे यांना घरी जाण्यासाठी सवड मिळाली. पूर्वी घराची ओढ तर असायची; पण घेतला वसा पूर्ण करण्याची इच्छा मनी बाळगून सुधाकर शिंदे आपले काम अखंड करीत राहिले. त्यांनी घडविलेले विद्यार्थी वृत्तपत्र, कंपन्यांत अधिकारी तर डॉक्टर म्हणूनही कार्यरत आहे. सातारी झेड्पी शाळेची अमेरिकेलाही पडली भुरळ कुसवडे शाळेला परदेशी पाहुण्याची भेट विजय पवार ल्ल नागठाणे कुसवडे, ता. सातारा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या शाळेचा लौकिक सातासमुद्रापार पोहोचविला आहे. शाळेत राबविला जाणारा ज्ञानरचनावाद हा उपक्रम जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील वेस्ट मिन्स्टर महाविद्यालयाच्या शिक्षकांनी कुसवडे शाळेला भेट दिली. कुसवडे ही शाळा कुमठे बीटमध्ये येते. शिक्षण विस्तार अधिकारी भराडे यांनी या शाळेत दोन वर्षांपूर्वी पहिली ते चौथीसाठी ज्ञानरचनावाद हा उप्रकम अतिशय प्रभावीपणे राबविला आहे. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी अमेरिकेतील वेस्ट मिन्स्टर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कॅरोलीन जेनकीन, शॅनॉन हुजेस, सीन थोर्पे, सूसान, व्हेनेसा, जॉर्डन, जॉन अ‍ॅब्डरहोल्डन, लॉरन, वॉटर्स, कॅरोला मॅण्डोस, केनी बोम, जॉन सईद, फँ्रक ब्लॅक, व्हिटने वॉल्कनहोरस्ट, नॉरमा इरिक्सन, कॅरी स्टिकर, कॅरिसा अ‍ॅलन, सी. जे. हार्वे, जिमी टनर, हॅले मॅलेरबी यांनी शाळेला भेट देऊन सर्व वर्गांची चिकित्सकपणे पाहणी केली. या शाळेतील शिक्षकांनी बालसभा, उत्स्फूर्त लेखन प्रकल्प, विविध विषयांचे पाठांतर, टाकाऊपासून टिकावू, अमृतवाणी, गांडूळखत, लेझीम, एरोबिक्स, मनोरे, नृत्य, नाट्य, इंग्रजी संभाषण, पाढे पाठांतर, परसबाग, वाचनालय, प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, सामान्यज्ञान आदी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली. उपक्रम पाहून परदेशी शिक्षक चकित कॅरोलीन जेनकीन या अमेरिकेत गेली २० वर्षे ज्ञानरचनावादाचे काम करत आहेत. त्यांनी शिक्षण प्रक्रियेत वेगवेगळे प्रयोग केले आहेत. कुसवडे शाळेत राबविलेला ज्ञानरचनावाद पाहून त्या भारावून गेल्या. आमच्या शाळेतील सर्वच शिक्षक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सोप्या पद्धतीने ज्ञानदान करतात. यासाठी ते विशेष कष्ट घेतात. आमची शाळा राज्यात रोल मॉडेल ठरावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. - अनिल चव्हाण, उपशिक्षक, कुसवड रविवारीही येतात सर शिकवायला... संजय पाटील ल्ल कऱ्हाड ऊन्हाळा, दिवाळी, नाताळ यासह अन्य सणासुदीच्या व साप्ताहिक सुट्ट्या गृहीत धरता प्राथमिक व माध्यमिक शाळांचे ज्ञानादानाचे काम दोनशे ते अडीचशे दिवस चालते; पण वाघेश्वर, ता. कऱ्हाड शाळा वर्षातील ३६२ दिवस भरते. या शाळेतील शिक्षक दिवाळीतील फक्त तीन दिवस सुट्टी घेतात. एरव्ही प्रत्येक दिवस त्यांचे ज्ञानदानाचे काम सुरूच असते. वाघेश्वर गावामध्ये ९ जुलै १९८१ रोजी प्राथमिक शाळा स्थापन झाली. उपक्रमशील शिक्षकांमुळे या शाळेचा लौकिक वाढला आहे. शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त असलेली व २०११ मध्ये ब्रिटिश कौन्सिलतर्फे ‘इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅवॉर्ड’ मिळालेल्या या शाळेत १५ शिक्षक कार्यरत असून ५२३ पट आहे. विद्यार्थ्याच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तीन वर्षापूर्वी या शाळेत विनासुट्टी उपक्रम राबविण्यात आला. व्यवस्थापनाने सुट्टीच्या कालावधीमध्ये जादा तासाचे शिक्षकनिहाय नियोजन केले आहे. यामध्ये कोणत्याही सुट्टीचा किंवा सणाचा विचार न करता शाळा भरवली जाते. दिवाळीमध्ये फक्त तीन दिवस शाळेला सुट्टी असते. एरव्ही तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवीचे वर्ग सुट्टीदिवशीही भरतात. मुख्याध्यापक यशवंत खाडे, शारदा क्षीरसागर, मंगल शेवाळे, काटू सोमेश्वर, वृषाली शेटे, वासंती कांबळे, कांता सावंत, आनंदराव शेलार, माधुरी अहिवळे, मंजूषा उमरदंड, शारदा दीक्षित, बिस्मिल्ला तांबोळी, नकुशी देवकर, सुषमा भोसले, संजय सावंत, अशोक जगदाळे, अमिन शिकलगार हे सुट्टीदिवशीही ज्ञानदान करतात. शाळेतील पूर्व स्वच्छ व सुंदर शाळा, लहान मुलांसाठी बालोद्यानाची सुविधा, ई लर्निंग इंटरनेट सुविधा, सुसज्य संगणक कक्ष, ई लायब्ररी, स्वतंत्र प्रयोगशाळा, इंग्रजी प्रयोगशाळा, सुसज्य वाचनालय, सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून येथील शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी झटत आहेत. संजय पाटील ल्ल कऱ्हाड ऊन्हाळा, दिवाळी, नाताळ यासह अन्य सणासुदीच्या व साप्ताहिक सुट्ट्या गृहीत धरता प्राथमिक व माध्यमिक शाळांचे ज्ञानादानाचे काम दोनशे ते अडीचशे दिवस चालते; पण वाघेश्वर, ता. कऱ्हाड शाळा वर्षातील ३६२ दिवस भरते. या शाळेतील शिक्षक दिवाळीतील फक्त तीन दिवस सुट्टी घेतात. एरव्ही प्रत्येक दिवस त्यांचे ज्ञानदानाचे काम सुरूच असते. वाघेश्वर गावामध्ये ९ जुलै १९८१ रोजी प्राथमिक शाळा स्थापन झाली. उपक्रमशील शिक्षकांमुळे या शाळेचा लौकिक वाढला आहे. शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त असलेली व २०११ मध्ये ब्रिटिश कौन्सिलतर्फे ‘इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅवॉर्ड’ मिळालेल्या या शाळेत १५ शिक्षक कार्यरत असून ५२३ पट आहे. विद्यार्थ्याच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तीन वर्षापूर्वी या शाळेत विनासुट्टी उपक्रम राबविण्यात आला. व्यवस्थापनाने सुट्टीच्या कालावधीमध्ये जादा तासाचे शिक्षकनिहाय नियोजन केले आहे. यामध्ये कोणत्याही सुट्टीचा किंवा सणाचा विचार न करता शाळा भरवली जाते. दिवाळीमध्ये फक्त तीन दिवस शाळेला सुट्टी असते. एरव्ही तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवीचे वर्ग सुट्टीदिवशीही भरतात. मुख्याध्यापक यशवंत खाडे, शारदा क्षीरसागर, मंगल शेवाळे, काटू सोमेश्वर, वृषाली शेटे, वासंती कांबळे, कांता सावंत, आनंदराव शेलार, माधुरी अहिवळे, मंजूषा उमरदंड, शारदा दीक्षित, बिस्मिल्ला तांबोळी, नकुशी देवकर, सुषमा भोसले, संजय सावंत, अशोक जगदाळे, अमिन शिकलगार हे सुट्टीदिवशीही ज्ञानदान करतात. शाळेतील पूर्व स्वच्छ व सुंदर शाळा, लहान मुलांसाठी बालोद्यानाची सुविधा, ई लर्निंग इंटरनेट सुविधा, सुसज्य संगणक कक्ष, ई लायब्ररी, स्वतंत्र प्रयोगशाळा, इंग्रजी प्रयोगशाळा, सुसज्य वाचनालय, सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून येथील शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी झटत आहेत. े शिक्षकानं केली ‘रेडिओ क्लब’ची स्थापना... नितीन काळेल ल्ल सातारा काही शिक्षक हे उपक्रमशील असतात. शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्यांना आनंद मिळतो. अशा कामांतून व उपक्रमातून त्या शिक्षकाला समाजाचीही मान्यता मिळते. असेच उपक्रमशील शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या वरकुटे मलवडी शाळेतील एम.डी. चंदनशिवे या शिक्षकाकडे पाहिले जाते. माण तालुक्यातील शाळेत सर्वप्रथम त्यांनी आपल्या वरकुटे मलवडीच्या शाळेत रेडिओ क्लबची स्थापना करुन दाखविली आहे. या क्लबमुळे मुलांचा कलागुणांना वाव मिळण्यास मदत झाली आहे. माण तालुक्यातील शिरताव येथील चंदनशिवे हे रहिवाशी आहेत. १९९६ ला पाटण तालुक्यात त्यांनी सेवारंभ केला. पाटणमधील नवसआवाड (घाणबी) आणि धनगरवाडा (मरड) या नवीन शाळा सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांनी लोकसहभागातून मरड शाळेपासून पवनचक्की पठारापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात सहभाग घेतला. माण तालुक्यातील अंधरवडवाडी येथे शाळेसमोर सुमारे अडीच लाखांची दुहेरी पाणीपंप योजना सुरू केली. वरकुटे मलवडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत ते अध्यापन करीत आहेत. आनंदबाजारच्या उत्कृष्ट नियोजनाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या उपक्रम पुस्तिकेवर त्यांची दखल घेण्यात आली आहे. विज्ञान प्रदर्शनात अनेकवेळा तालुका तसेच जिल्हास्तरावर सहभाग घेण्यात आला आहे. त्यांची तालुका, जिल्हा, विभागीस्तर प्रशिक्षणात उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून ओळख आहे. वरकुटे मलवडी येथे रुजू झाल्यावर स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थी पटसंख्या टिकविण्यासाठी त्यांनी यश मिळविले आहे. जंगलवाटेनं जाताना उडायचा थरकाप लक्ष्मण गोरे ल्ल बामणोली कासपासून १५ कि.मी. अंतरावर कात्रेवाडी हे गाव. या गावापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची वाहनाची सोय नव्हती. दोन तास पायी प्रवास करावा लागतो. आजूबाजूला घनदाट जंगल असल्यामुळे प्राण्यांची खूप भिती वाटत असे. कारण या भागामध्ये अस्वलाचे प्रमाण जास्त असे. आम्ही कित्येकदा असे भितीदायक प्रसंग अनुभवले आहेत. कात्रेवाडी शाळेचे शिक्षक तानाजी आगुंडे अनुभव कथन करत होते. आजही मला माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवतो. एका घनामध्ये शाळा भरवली होती. कारण वस्तीशाळा असल्यामुळे आम्हाला शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नव्हत्या. मला फक्त १००० रुपये पगार मिळत होता. सन २००१ ते २०१० पर्यंत आम्हाला शासनाची मदत मिळत नव्हती; पण ग्रामस्थांच्या सहकार्याने दहा वर्षे आम्ही घरामध्येच शाळा भरवली. गावकरीच आम्हा शिक्षकांना दोन्ही वेळेचे जेवण देत होते; पण दुर्गम भागात शाळा असली तरी प्रत्येक उपक्रमामध्ये आमच्या शाळेचा सहभाग होता व आमच्या भागामध्ये गावोगावी यात्रांमध्ये आमच्या शाळेतील विविध कलापथके आजही सादर होतात. आमच्या शाळेतील मुले खूप हुशार आहेत. जे जे उपक्रम राबवतो ते उत्साहाने पार पाडतात. २०१० रोजी आमच्या शाळेचे जि. प. प्राथमिक शाळेत रूपांतर झाले. आमच्या शाळेला परदेशी पाहुण्यांनी भेट दिलेली आहे.