शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडला पालकमंत्री आले; पण कोणी नाही पाहिले...; दौरा फक्त राहिला जेवणापुरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 23:18 IST

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे कऱ्हाडकडे नेहमीच दुर्लक्ष राहिल्याचा आरोप होतो

ठळक मुद्देशिवसेनेचे पदाधिकारीही अनभिज्ञ

कऱ्हाड : सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे कऱ्हाडकडे नेहमीच दुर्लक्ष राहिल्याचा आरोप होतो. शनिवारी दुपारी मात्र त्यांच्या येण्याची चाहूल कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात अचानक लागली. दुपारी दोनच्या सुमारास ते आले खरे; पण त्यांच्या स्वागताला कोणीही शिवसैनिक दिसत नव्हता. ना कोणाशी त्यांनी काही चर्चा केली. फक्त जेवले आणि शिवतारे बापू निघून गेले. त्यामुळे बापूंचा कऱ्हाड दौरा फक्त जेवणापुरता होता की काय, अशी चर्चा सुरू झाली. तर पालकमंत्री आले; पण कोणी नाही पाहिले, अशीच काहीसी परिस्थिती त्यांच्या दौऱ्याची झाली आहे.

कऱ्हाडची ओळख ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहर म्हणून आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असणाऱ्या कऱ्हाडला राजकीय पंढरी म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे सर्वच पक्षातील नेते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक व्हायला वरचेवर येताना दिसतात. तर बऱ्याच राजकीय घडामोडींचे केंद्र कऱ्हाडच राहिल्याचे पाहायला मिळते. मात्र, जिल्ह्याच्या या पालकमंत्र्यांनी कऱ्हाडची ‘शिव’ बहुदा फारशी ओलांडलेली दिसत नाही. त्यामुळे येथील शिवसैनिकांच्यात शिवधनुष्य उचलण्यासाठी बळ कधी येणार? हा संशोधनाचा विषय आहे. वास्तविक, येथील शिवसैनिकांनाही पालकमंत्री आपले कधी वाटलेले दिसत नाहीत. त्यांच्या येण्याने वा जाण्याने कोणाच्या चेहऱ्यावर ‘हर्ष’ दिसत नाही. त्याचेच प्रत्यंतर आजही पाहायला मिळाले.जिल्हा प्रमुखही अनभिज्ञ..सातारा जिल्ह्यात फक्त पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, शंभूराज देसाई अन् विजय शिवतारे यांच्यातील सख्य साºया जिल्ह्याला माहीत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनीही आपल्याला या दौऱ्याची माहिती नसल्याचे सांगितले.कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी दुपारी पालकमंत्री विजय शिवतारे यांनीअल्पकाळ हजेरी लावली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShiv Senaशिवसेना