शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

‘जीएसटी’ने वाढवला ‘वाणिज्य’चा टक्का! जिल्ह्यातील चित्र : १२०० विद्यार्थी प्रवेशाविना; वाढीव तुकड्यांची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:12 IST

वाणिज्य शाखेत ‘जीएसटी’मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता बाजारपेठेत निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला सर्वाधिक पसंती दिली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग १६ जुलैपासून सुरू झाले असले

ठळक मुद्दे जिल्ह्यातील चित्र : १२०० विद्यार्थी प्रवेशाविना; वाढीव तुकड्यांची आवश्यकता

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : वाणिज्य शाखेत ‘जीएसटी’मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता बाजारपेठेत निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला सर्वाधिक पसंती दिली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग १६ जुलैपासून सुरू झाले असले तरीही सुमारे १२०० विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश अद्यापही प्रतीक्षित आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. त्यामुळे महाविद्यालयांना तुकड्या वाढवून घेण्याशिवाय महाविद्यालयांपुढे पर्याय उरलेला नाही.

विज्ञान शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन मर्यादित झालेल्या नोकऱ्यांची संख्या लक्षात घेता विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कल बदलला असल्याचे चित्र यातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविले आहेत. विद्यार्थी प्रवेशाचा कोटा संपल्यामुळे जिल्ह्यातील सातारा, दहिवडी आणि फलटण या तीन ठिकाणच्या सुमारे बाराशे विद्यार्थ्यांचा प्रवेश अद्यापही अडकून पडला आहे. साताºयातील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात १ हजार ७२० अर्ज दाखल झाले होते. यातील ७२० प्रवेश निश्चित केले असून, १ हजार प्रवेश अर्ज कोटा पूर्ण झाल्यामुळे तसेच महाविद्यालयात आहेत.

यातील निम्म्या विद्यार्थ्यांनी अन्यत्र प्रवेश मिळविला तरीही पाचशे विद्यार्थ्यांना प्रवेश देणे गरजेचे ठरणार आहे. दहिवडी महाविद्यालयात ५२६ तर फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात ९० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीत आहेत. महाविद्यालयांकडून पोहोचलेल्या या प्रस्तावावर उपसंचालकांनी परवानगी दिली तर लगेचच या विद्यार्थ्यांचे प्रवेश तुकडीवाढवून निश्चित करण्यात येणार आहेत.वाणिज्य शाखेतील नवीन अभ्यासक्रम‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर त्याच्याशी निगडीत अन्य काही अभ्यासक्रम वाणिज्य महाविद्यालयात समाविष्ट करून घेण्यात आला आहे. यात प्रामुख्याने ई-कॉमर्स, टॅली, सीपीटी, अ‍ॅपलाईड कॉमर्स आणि जीएसटी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आर्थिक सक्षम होण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकविला जात असल्यामुळेविद्यार्थ्यांना अर्थार्जनाची मोठी संधी उपलब्ध होण्याचे पर्याय खुले आहेत.अकरावी प्रवेश क्षमता २०१८-२०१९शाखा अनुदानित, विनाअनुदानित/ स्वयंअर्थकायम विनाअनुदानित सहाय्यितकला १५,४६० ३,३६० २४०वाणिज्य ७,०८० १,१२० ८८०विज्ञान ११,२०० ३,८४० २,८६०संयुक्त ३,००० २४० ४००एकूण ३६,७४० ८,५६० ४,३८० 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थी