शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव मानधनाकडे कोतवालांच्या नजरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 13:50 IST

शासनाने कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोतवाल संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात सलग तीन महिने आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने कोतवालांना मानधन वाढ दिली. चोवीस काम पण हातात अपुरे दाम, अशी परिस्थिती असणाऱ्या कोतवालांना आणखी खूश करण्यासाठी मानधन वाढविण्याबाबत शासनाची तयारी आहे, ही वाढ कधी पदरात पडते, याकडे कोतवालांच्या नजरा लागल्या आहेत.

ठळक मुद्देवाढीव मानधनाकडे कोतवालांच्या नजरा!कामाचा ताण : चतुर्थ श्रेणी दर्जाबाबत शासन उदासीन

सागर गुजरसातारा : शासनाने कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोतवाल संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात सलग तीन महिने आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने कोतवालांना मानधन वाढ दिली. चोवीस काम पण हातात अपुरे दाम, अशी परिस्थिती असणाऱ्या कोतवालांना आणखी खूश करण्यासाठी मानधन वाढविण्याबाबत शासनाची तयारी आहे, ही वाढ कधी पदरात पडते, याकडे कोतवालांच्या नजरा लागल्या आहेत.कोतवालांना चोवीस तास राबवूनही त्यांच्या खिशात पुरेसे दाम दिले जात नाही. शासन चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात टाळाटाळ केली गेली. गावामध्ये होणारे चुकीचे प्रकार रोखण्यासाठी कोतवालांचा मुख्य वापर केला जातो. अवैध वाळू वाहतूक असेल किंवा कुठलाही गैरप्रकार यावर कोतवालाचा लक्ष असतो. कोतवालांकडून अनेक कामे करून घेतली जातात.

अभिलेख कक्षातील रेकॉर्ड सांभाळणे, शेतसारा गोळा करण्यात तलाठ्याला मदत, पीक पाहणी, नैसर्गिक आपत्ती, वाळू चोरीवर लक्ष, निवडणूक ड्यूटी, अशी कामे नित्यनेमाने करतात. त्याव्यतिरिक्त कोतवालांना तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये शिपायाचे काम करावे लागते. अनेक ठिकाणी तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या वाहनांवर पूर्णवेळ चालक उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांनी वाहन चालविण्याचा परवाना असणाºया कोतवालांना चालक पदावर नेमण्यात आले आहे.

सातबारा संगणकीकरणाच्या कामातही सुशिक्षित व संगणक हाताळणाºया कोतवालांचा वापर केला जात आहे. कोतवालांना ५ हजार मानधन मिळत होते. कोतवाल संघटनेच्या वतीने डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी असे सलग तीन महिने ठिय्या आंदोलनानंतर शासनाने पाच हजारांच्या मानधनात अडीच हजारांची वाढ केली.

फेब्रुवारी महिन्यापासून कोतवालांना वाढीव मानधन मिळत आहे. महसूल विभाग कोतवालांच्या मानधनात आणखी हजार रुपयांची वाढ करणार आहे, या वाढीकडे कोतवालांच्या नजरा लागल्या आहेत.चतुर्थ श्रेणी दर्जा मिळाला तर फायदाजिल्ह्यात ४३८ कोतवाल आहेत, तर संपूर्ण राज्यात हीच संख्या १२ हजार ६३७ कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा दिला गेला तरच शासन नियमानुसार त्यांना पगार मिळेल. तसेच वेतन आयोगाचा लाभही मिळू शकेल, यासाठी कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा दिला जावा, यासाठी संघटनांचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर