किडगाव : नेले, ता. सातारा या गावाला राष्ट्रीय पेयजल योजनेतून तब्बल सात वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. मात्र, नाकर्ते अधिकारी व ठेकेदारामुळे ही योजना अपूर्ण अवस्थेत होती. तब्बल ४६ लाख खर्च करून ही योजना मार्गी लागणार असून, यासाठी विहिरीचे व मोटारगृहाचे काम झाले आहे.पाणीपुरवठा करण्यासाठी नेले नवीन गावठाण येथे पाण्याच्या टाकीची उभारणी व पाईपलाईन टाकण्याच्या कामाला गती मिळाली आहे. यामुळे नेले, फरासवाडी, डांगेवस्ती व नवीन गावठाण येथील लोकांना मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे.या कामाचा शुभारंभ विकास सेवा सोसायटीचे संचालक बाळासो सावंत यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच वैशाली जाधव, उपसरपंच चंद्रकांत टिळेकर, माजी सरपंच सदाशिव जाधव, ग्रामपंचायत सदस्य महादेव जाधव, आशा कांबळे, सिकंदर मोकाशी, अशोक जाधव, हणमंत पिसाळ, नामदेव जाधव, मोहन कुंभार, नामदेव डांगे, ग्रामसेवक एस. आर. गायकवाड व ग्रामस्थ आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी पाठपुरावा केला आहे. (वार्ताहर)गेली सात वर्षे रखडलेले काम मार्गी लागल्याने गावाला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा मिळणार आहे. कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींमुळे हे झाले.-महादेव धोत्रे, संचालक, अजिंक्यतारा साखर कारखानालोकांचा सहभाग व कर्तव्यदक्ष अधिकारी असतील तर विकासकामे होत राहतात. हे थांबलेले काम मार्गी लागते. यामुळे आनंद वाटतो.-बबनराव पाटील, ग्रामस्थ, नेले
नेलेच्या पाणीपुरवठा योजनेला सात वर्षांनी हिरवा कंदील
By admin | Updated: December 26, 2014 00:20 IST