शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: शिरवळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा ठरली वादळी, दारुबंदीसाठी विशेष सभा घेण्याचा ठराव संमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 18:28 IST

विविध विषयांवरुन सभा ठरली वादळी

मुराद पटेल  शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ ग्रामपंचायतची ग्रामसभा विविध विषयांवरुन वादळी ठरली. यावेळी गावात दारुबंदीचा ठराव घेण्याकरीता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे याबाबतचा ठराव घेण्यात आला. या ठरावामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. तर गट क्रं.655 हा शासनाने भाडेतत्वावर न देता सार्वजनिक हिताकरीता राखीव ठेवण्याचा ठराव करण्यात आला.   प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच रविराज दुधगावकर होते. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उदय कबुले, खंडाळा पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र तांबे, गुरुदेव बरदाडे, शिरवळ उपसरपंच ताहेर काझी, ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. विविध विषयांवरुन सभा वादळी ठरली.यात सदनिकांचे, गाळेधारकांचे तसेच ग्रामपंचायतच्या मिळकतींची फेरसर्व्हे, घनकचऱ्याचा प्रकल्प गट क्रं.655 मध्ये करण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी शासनाकडून आलेल्या प्लास्टिक निर्मुलन प्रकल्प राबवित शिरवळला प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. सांडपाण्याचा प्रश्नही नवनिर्वाचित सरपंच रविराज दुधगावकर यांनी व नवनियुक्त सदस्य यांनी निकाली काढण्याचा ठराव करण्यात आला आहे.दरम्यान, सुभानमंगल किल्ल्याच्या प्रश्नावरुन खंडाळा पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र तांबे व महादेव कांबळे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याने गावात दारुबंदीचा निर्णय घेण्याकरीता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा ठराव जनता फाऊंडेशनचे इम्रान काझी व अंजिक्य कांबळे यांनी मांडत ठराव संमत केला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायत