शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; जिल्हा परिषदेसमोर निदर्शने अन् घोषणाबाजी 

By नितीन काळेल | Updated: February 26, 2024 16:45 IST

पाणीपुरवठा थांबणार अन् कचरा साठणार 

सातारा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे यासह विविध मागण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे गावातील पाणीपुरवठा थांबणार असून कचराही साठणार आहे. तर बंदमधील कर्मचाऱ्यांनी मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून घोषणाबाजी केली.  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले.  यामध्ये राज्य अध्यक्ष राजन लिंगाडे, सातारा जिल्हाध्यक्ष प्रभाकर नेवसे, कार्याध्यक्ष रमेश भोसले, सचिव रनजित वरखडे, प्रसिद्धीप्रमुख जे. के. काळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. याबाबत जिल्हा परिषद ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.  त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यातील हजारो ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता कामगार, पाणीपुरवठा अन् वीजपुरवठा तसेच लिपिक पदावर अनेक कामगार काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. त्यावेळी आश्वासन देण्यात आले. परंतु त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे २६ ते २९ फेब्रुवारी यादरम्यान राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचारी यांच्याप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, निवृत्त वेतन अन् उपदान लागू करावे.  वेतनासाठी लाभलेली वसुलीची अट रद्द करण्यात यावी, आकृतीबंध सुधारणा कराव्यात. जिल्हा परिषद सेवेत एकूण रिक्तच्या दहा टक्के जागांवर आणि वर्ग तीन व चारच्या पदावर नियुक्ती करावी अशा आमच्या मागण्या आहेत. या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात. यासाठी आंदोलन करत आहोत.दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ग्रामपंचायतच्या कामावर परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांनी पाणी सोडणे बंद केले आहे. तसेच दिवाबत्ती आणि स्वच्छतेचे कामही थांबवण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणीशी सामना करावा लागणार आहे.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतagitationआंदोलन