शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर-शिक्षक निवडणूक : कऱ्हाडात रांगा लावून मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 12:14 IST

Pune, Vidhan Parishad Election, karad, satara, विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी ८ ते १0 या दोन तासांच्या कालावधीत ५ हजार ७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधरसाठी ४ हजार २५८ मतदारांनी तर शिक्षकसाठी ८२१ मतदारांनी मतदान केले. सकाळच्या वेळेत मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.

ठळक मुद्देपदवीधर-शिक्षक निवडणूक : कऱ्हाडात रांगा लावून मतदान सकाळी १0 वाजेपर्यंत ५ हजार ७९ मतदारांनी बजावला हक्क

सातारा : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी ८ ते १0 या दोन तासांच्या कालावधीत ५ हजार ७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधरसाठी ४ हजार २५८ मतदारांनी तर शिक्षकसाठी ८२१ मतदारांनी मतदान केले. सकाळच्या वेळेत मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.जिल्ह्यातील १७६ मतदान केंद्रांवर आज (मंगळवार) सकाळी ८ पासून मतदानाला सुरुवात झाली. कऱ्हाडात यशवंत हायस्कूलसह इतर काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचे पहायला मिळाले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सकाळी आझाद कॉलेजच्या मतदान केंद्रात जाऊन मतदान केले.

सयाजी कॉलेज, शिवाजी कॉलेज या ठिकाणी देखील मतदानासाठी मतदारांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. विशेषत: पदवीधर मतदारांमध्ये उत्साह जाणवला. शिक्षक मतदारसंघामधील ७ हजार ७११ मतदारांपैकी सकाळी १0 वाजेपर्यंत ८२१ मतदारांनी म्हणजे १0.६५ टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये ६९७ पुरुष तर १२४ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी ५९ हजार ७१ मतदारांपैकी ४ हजार २५८ मतदारांनी मतदान केले. एकूण मतदानाच्या ७.२१ टक्के मतदान झाले. मतदानाच्या ठिकाणी प्रशासनातर्फे विशेष उपाययोजना राबविल्याने अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.प्रश्न सोडविण्याच्या पदवीधरांच्या अपेक्षाअनेकांनी पहिल्यांदाच मतदान करायला मिळाल्याचे सांगितले. तसेच निवडून येणाऱ्या आमदारांनी पदवीधरांचे प्रश्न सोडवावेत, अशा प्रतिक्रिया देखील नवमतदारांनी व्यक्त केल्या. तसेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे मत देखील काही पदवीधारकांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकKaradकराडSatara areaसातारा परिसरPuneपुणे