शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांबद्दल 'अशी' विधाने करणे म्हणजे विकृती, राज्यपालांनी राजीनामा द्यावा - उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 12:57 IST

शिवरायांवर वादग्रस्त टिपणी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करण्यापेक्षा त्यांचा इतिहास वाचला तर चांगले होईल. शिवरायांवर अनेकवेळा वेगवेगळी विधाने करण्यात आलेली आहेत. अशी विधाने करणाऱ्यांमध्ये विकृती असावी, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप खासदार उदयनराजे यांनी दिली.राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. खा. उदयनराजे यांनीदेखील या वक्तव्याचा निषेध नोंदविला. ते म्हणाले, वादग्रस्त वक्तव्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. राज्यपाल हे पद मोठे आहे. हे पद कोश्यारी यांना झेपत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा. शिवरायांवर वादग्रस्त टिपणी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.विचार करून बोलायला हवे : शिवेंद्रसिंहराजेछत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जातील, अशी वक्तव्ये कोणीच करू नयेत. पदावर असणाऱ्या व्यक्तींनी तर करूच नये. यामुळे समाजामध्ये वाईट विचार पसरतात. अशा वक्तव्यांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. जबाबदार व्यक्तींनी आपण काय बोलतो, त्याचा जनतेला काय संदेश जातोय, याचा विचार करून बोलले पाहिजे, अशा शब्दात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कान टोचले

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले