शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शासनाच्या चिठ्ठीमुक्त दवाखाना योजनेचा फज्जा : शासकीय रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:27 IST

गेल्या दोन वर्षांत शासनाकडून रुग्णालयांना औषधांचा पुरवठा न केल्याने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे ओढावलेल्या टंचाईमुळे अनेक रुग्णांना खासगी

ठळक मुद्देशासनाच्या धोरणामुळे औषधांचा तुटवडा, रुग्णांना खासगी मेडिकलचा आधार

स्वप्नील शिंदे ।सातारा : गेल्या दोन वर्षांत शासनाकडून रुग्णालयांना औषधांचा पुरवठा न केल्याने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे ओढावलेल्या टंचाईमुळे अनेक रुग्णांना खासगी मेडिकलमधून औषधे विकत घेऊन उपचार करून घ्यावे लागत आहे. त्यामुळे शासनाच्या ‘औषधांची चिठ्ठीमुक्त दवाखाना’ योजनेचा फज्जा उडाला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या औषध भंडार विभागाकडून दरवर्षी रुग्णालयाने केलेल्या मागणीनुसार औषधांचा पुरवठा केला जात होता. तो औषध पुरवठा सहा महिने किंवा एक वर्षांसाठी केला जात होता. त्या औषधांद्वारे रुग्णांना आरोग्य सेवा पुरवली जात होती. मात्र, राज्य शासनाकडे काही तक्रारी झाल्याने शासनाने आपला औषध भंडार विभाग बंद केला. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत सर्व शासकीय रुग्णालय, आरोग्य महाविद्यालयांना औषधांचा पुरवठा करण्यात आला नाही.

रुग्णालयात दोन वर्षांपूर्वीचे औषधे शिल्लक आहेत. त्यात दोन वर्षांत औषधे आली नाही. त्यामुळे रुग्णालयात औषधांचा तुटवठा निर्माण झाला. त्याचा परिमाण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर उपचार करत असताना कर्मचारी हात आकडता घेऊ लागले. रुग्णांना औषधे देत असताना एक आठवड्याची औषधे देण्याऐवजी केवळ एक किंवा दोन दिवसांची औषधे देण्यात येऊ लागली. तसेच बहुतेक औषधे तर बाहेरील खासगी मेडिकलमधून आणण्याची चिठ्ठी दिली जाऊ लागली.

अगदी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण, गर्भवती माता, नवजात बालके, आॅपरेशनसाठी लागणारी सर्व औषधे संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून आणण्यासाठी सर्रास चिठ्ठी लिहून दिली जात आहे. त्यामुळे शासनाने मोठ्या गाजावाजाने सुरू केलेली औषधांचा चिठ्ठीमुक्त दवाखाना या योजनेचा बोजबारा उडाला आहे.आता औषधांची खरेदी हाफकीनकडूनचमहाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाने १७ फेब्रुवारी २०१८ मध्ये सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, महिला व बाल विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी विकास व जिल्हा परिषद या विभागांनी औषधे, रुग्णालय उपभोग्य वस्तू व वैद्यकीय उपकरणे याबाबींची खरेदी हाफकीन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत करण्याचा निर्णय घेतला.केवळ महिनाभर पुरेल एवढाच औषध साठा

जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत सध्या तापापासून, मधुमेह, टीबी, उच्च रक्तदाबासह बहुतेक प्रमुख औषधांचा साठा महिनाभर पुरेल एवढाच आहे. अनेक इंजेक्शन तर उपलब्धच नाहीत, अशा गंभीर स्थितीत प्रशासन काम करत आहे. 

जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. मात्र, रुग्णांना ती सेवा पुरवण्यात प्रशासन कमी पडत नाही. प्रत्येक रुग्णांना आवश्यक ते उपचार करत असून, काही प्रमाणात काटकसर सुरू आहे.डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMedicalवैद्यकीय