सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी २ हजार २७० संस्था सभासद मतदानास पात्र आहेत. एकट्या सातारा तालुक्याकडे सर्वात जास्त ५५४ मतदार असून, हा तालुकाच निर्णायक भूमिका बजावणार आहे. माण तालुका सोसायटी मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे विरुद्ध माजी आमदार सदाशिव पोळ व नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघात राजेश पाटील-वाठारकर विरुद्ध प्रभाकर साबळे या लढतीच रंगतदार ठरणार आहेत. इतर लढती मात्र एकतर्फीच पाहायला मिळत आहेत. निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या २८ उमेदवारांचे भविष्य २,२७0 मतदारांच्या हाती असणार आहे. कृषी प्रक्रिया, महिला राखीव, कोरेगाव सोसायटी मतदारसंघातून प्रमुख बंडखोरांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याने त्याठिकाणची चुरस संपल्यात जमा आहे. इतर मागास, भटक्या जमाती, अनुसूचित जाती या मतदारसंघातील उमेदवारांचे भविष्यही सर्वच मतदारांच्या हाती असल्याने निवडून येण्यासाठी यापैकी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तालुकानिहाय मतदान असे : सातारा -१४३ (सोसायटी), नागरी बँका मतदारसंघात बँका ९, पतपेढ्या १०८ अशी मिळून ११७ मते खरेदी विक्री संघ मतदारसंघात-२; औद्योगिक व मजूर मतदारसंघात- औद्योगिक ५, मजूर ४८, पाणीपुरवठा २५, ग्राहक ९ इतर १४, व्यक्ती ३ अशी मिळून १०४ मते आहेत, कृषी प्रक्रिया मतदारसंघात-९ मते; गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघात गृहनिर्माण-१२१, दुग्धसंस्था ५८ अशी मिळून १७९ मते असून, या तालुक्यात ५५४ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. कऱ्हाड -१४० (सोसायटी), नागरी बँका मतदारसंघात बँका ६, पतपेढ्या ८० अशी मिळून ८६ मते खरेदीविक्री संघ मतदारसंघात-१; औद्योगिक व मजूर मतदारसंघात- औद्योगिक ३, मजूर ६, पाणीपुरवठा २९, ग्राहक १ इतर ६, व्यक्ती ५ अशी मिळून ५० मते आहेत, कृषी प्रक्रिया मतदारसंघात-४ मते; गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघात गृहनिर्माण-१३, दुग्धसंस्था ७६ अशी मिळून ८९ मते असून, या तालुक्यात ३७० मतदार बजावणार आहेत. कोरेगाव -९० (सोसायटी), नागरी बँका मतदारसंघात बँका २, पतपेढ्या १९, अशी मिळून २१ मते खरेदीविक्री संघ -१; औद्योगिक व मजूर मतदारसंघात- औद्योगिक २, मजूर ८, पाणीपुरवठा ६, ग्राहक १ इतर ३, व्यक्ती ३ अशी मिळून २३ मते आहेत, कृषी प्रक्रिया मतदारसंघात-२ मते; गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघात गृहनिर्माण-३, दुग्धसंस्था २२ अशी मिळून २५ मते असून, १६२ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. वाई - ५९ (सोसायटी), नागरी बँका मतदारसंघात बँका ३, पतपेढ्या ३३ अशी मिळून ३६ मते खरेदीविक्री संघ मतदारसंघात-१; औद्योगिक व मजूर मतदारसंघात- औद्योगिक १, मजूर १५, पाणीपुरवठा ६, ग्राहक ३ इतर ५, व्यक्ती ३ अशी मिळून ३३ मते आहेत, कृषी प्रक्रिया मतदारसंघात-२ मते; गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघात गृहनिर्माण-८ दुग्धसंस्था ९ अशी मिळून १७ मते असून, या तालुक्यात १४८ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. खटाव तालुक्यातील विकास सोसायटी मतदारसंघात-१०३, नागरी बँका मतदारसंघात बँका १, पतपेढ्या २५ अशी मिळून २६ मते खरेदीविक्री संघ मतदारसंघात-१; औद्योगिक व मजूर मतदारसंघात- औद्योगिक १, मजूर १८, पाणीपुरवठा १, इतर २, व्यक्ती ५ अशी मिळून २७ मते आहेत, कृषी प्रक्रिया मतदारसंघात-१ मत; गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघात गृहनिर्माण-१, दुग्धसंस्था ८ अशी मिळून ९ मते असून, या तालुक्यात १६७ मतदार आहेत. पाटण -१०४ (सोसायटी), नागरी बँका मतदारसंघात बँका २, पतपेढ्या ३३ अशी मिळून ३५ मते खरेदीविक्री संघ मतदारसंघात-१; औद्योगिक व मजूर मतदारसंघात- औद्योगिक ४, मजूर ६, पाणीपुरवठा २३, इतर २, व्यक्ती ३ अशी मिळून ३८ मते आहेत, कृषी प्रक्रिया मतदारसंघात-१ मते; गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघात दुग्धसंस्था ४२ अशी मिळून ४२ मते असून, या तालुक्यात २२१ मतदार आहेत. माण - ७३ (सोसायटी), नागरी बँका मतदारसंघात बँका १, पतपेढ्या २५ अशी मिळून २६ मते खरेदीविक्री संघ मतदारसंघात-१; औद्योगिक व मजूर मतदारसंघात- औद्योगिक १, मजूर १२, पाणीपुरवठा ३, इतर १ अशी मिळून १६ मते आहेत, कृषी प्रक्रिया मतदारसंघात एकही मत नाही. गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघात गृहनिर्माण-१, दुग्धसंस्था १५ अशी मिळून १६ मते असून, या तालुक्यात १३३ मतदार आहेत. खंडाळा - ५१ (सोसायटी), नागरी बँका मतदारसंघात पतपेढ्या १८ अशी मिळून १८ मते, खरेदीविक्री संघ मतदारसंघात-१; औद्योगिक व मजूर मतदारसंघात- मजूर ६, पाणीपुरवठा ६, ग्राहक १ इतर २, व्यक्ती १ अशी मिळून १६ मते आहेत, कृषी प्रक्रिया मतदारसंघात-१ मते; गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघात गृहनिर्माण-३, दुग्धसंस्था ७ अशी मिळून १० मते असून, या तालुक्यात ९७ मतदार आहेत. जावळी -४९ (सोसायटी), नागरी बँका मतदारसंघात पतपेढ्या ८ अशी मिळून ८ मते खरेदीविक्री संघ मतदारसंघात-१; औद्योगिक व मजूर मतदारसंघात मजूर ७ , इतर १, व्यक्ती १ अशी मिळून ९ मते आहेत, कृषी प्रक्रिया मतदारसंघात - १ मते; गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघात गृहनिर्माण-२, दुग्धसंस्था २२ अशी मिळून २४ मते असून, या ठिकाणी ९२ मतदार आहेत. महाबळेश्वर -११ (सोसायटी), नागरी बँका मतदारसंघात बँका १, पतपेढ्या १३ अशी मिळून १४ मते खरेदीविक्री संघ मतदारसंघात एकही नाही. औद्योगिक व मजूर मतदारसंघात- मजूर १, ग्राहक १ इतर ३ अशी मिळून ५ मते आहेत, कृषी प्रक्रिया मतदारसंघात-१ मते; गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघात गृहनिर्माण-६, दुग्धसंस्था ५ अशी मिळून ११ मते असून, या तालुक्यात ४२ मतदार आहेत. फलटण -१२८ (सोसायटी), नागरी बँका मतदारसंघात बँका १, पतपेढ्या ५५ अशी मिळून ५६ मते खरेदीविक्री संघ मतदारसंघात-१; औद्योगिक व मजूर मतदारसंघात- औद्योगिक २, मजूर ४०, पाणीपुरवठा ६, ग्राहक ३ इतर ७, व्यक्ती १८ अशी मिळून ७६ मते आहेत. कृषी प्रक्रिया मतदारसंघात-८ मते; गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघात गृहनिर्माण-३, दुग्धसंस्था १२ अशी मिळून १५ मते असून, या तालुक्यात २८४ मतदार आहेत. (प्रतिनिधी) दत्तानाना की बकाजीराव... खंडाळा सोसायटीत राष्ट्रवादीअंतर्गत असलेला तिढा सुटलेला नसल्याने याठिकाणी राष्ट्रवादीचे दत्तानाना ढमाळ यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, बँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील यांनी येथे बंडखोरी करून ढमाळ यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. तर आनंदराव शेळके-पाटील यांचाही अर्ज कायम असल्याने याठिकाणी दत्तानाना की बकाजीराव याची चर्चा सुरू आहे. प्रचाराच्या तोफा आज थंडावणार जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज (सोमवारी) थंडावणार असून, मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी ११ तालुक्यांत ११७ जणांची १३ पथके सज्ज झाली आहेत. यासाठी २२ मतदार प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे.
गोरे-पोळ, वाठारकर-साबळे संघर्षच रंगतदार!
By admin | Updated: May 4, 2015 00:23 IST