शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

वाटाण्याकडून शेतकऱ्यांना अच्छे दिन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:38 IST

सातारा : मागील महिन्यापासून वाटाण्याचा भाव वाढू लागला आहे. सातारा बाजार समितीत तर वाटाण्याला क्विंटलला ८ हजारांपर्यंत भाव ...

सातारा : मागील महिन्यापासून वाटाण्याचा भाव वाढू लागला आहे. सातारा बाजार समितीत तर वाटाण्याला क्विंटलला ८ हजारांपर्यंत भाव मिळू लागलाय. मागील चार महिन्यानंतरचा हा उच्चांक आहे. मात्र, दुसरीकडे कांद्याचा दर आणखी कोसळला असून, इतर भाज्यांना भाव कमीच असल्याचे दिसत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याची ४३३ क्विंटल आवक झाली. कांद्याला क्विंटलला ३०० पासून १३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील दीड महिन्यापूर्वी बाजार समितीत कांद्याचा दर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत होता. मात्र, त्यानंतर दर एकदमच गडगडला आहे.

सातारा बाजार समितीत गुरुवारी ४५ वाहनांतून ९८१ क्विंटल शेतमालाची आवक झाली. बटाटा ६५, लसूण २० आणि आल्याची ४ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. सातारा बाजार समितीत गवारला १० किलोस ४०० ते ५५० रुपये दर मिळाला. गवारचा दर अजूनही तेजीत आहे. तसेच शेवगा शेंगला ८० ते १२० रुपयांपर्यंत दर आला. शेवगा शेंगांच्या दरात उतार आहे, तर वांग्याला १० किलोला १५० ते २३० रुपये दर मिळाला. टोमॅटो ५० ते १००, कोबीला ४० ते ६० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे, तर फ्लॉवरला १० किलोला २५० ते ३०० आणि दोडक्याला ३०० ते ४०० रुपये भाव आला.

बटाट्याला क्विंटलला ८०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर अजूनही स्थिर आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे, तर हिरव्या मिरचीला क्विंटलला चार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. आल्याला १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आले दरात पुन्हा उतार आला आहे, तर लसणाला क्विंटलला दोन ते पाच हजारांपर्यंत भाव आला. लसणाचा दर कमी झाला आहे.

मागील चार महिन्यांपासून वाटाण्याचा दर कमी झाला होता. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला दीड हजारांपर्यंत दर मिळत होता. मात्र, मागील महिन्यापासून दरात सुधारणा झाली आहे. वाटाण्याला सध्या सात ते आठ हजार रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळत आहे, तर मंडईत १०० रुपये किलोपर्यंत वाटाणा पोहोचला आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अजूनही कांदा, टोमॅटो, वांगी, कोबीचे दर कमीच आहेत. यामुळे बळिराजांत नाराजी आहे.

चौकट :

कोथिंबीर पेंडी २० रुपयांवर...

सातारा बाजार समितीत गुरुवारी पालेभाज्यांची आवक चांगली झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दरात सुधारणा आहे. कोथिंबीर पेंडीचा दर २० रुपयांच्या पुढे गेला आहे. मेथीच्या १२०० पेंडीची आवक झाली. याला शेकडा १ हजार ते १५०० रुपये दर मिळाला, तर कोथिंबीरची १८०० पेंडी आली. याला शेकडा ८०० ते १ हजार रुपयांदरम्यान भाव मिळाला, तर पालकला शेकडा ५०० ते ६०० रुपये भाव आला. सध्या मेथी, कोथिंबीरला चांगला दर मिळत असल्याचे दिसून येत आहे.

......................................................