शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : गोडवाडीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 18:03 IST

बक्षीसपत्राची नोंद करून सातबारा आणि फेरफार उतारा देण्यासाठी दीड हजाराची लाच घेताना गोडवाडी (उंब्रज) ता. कऱ्हाड येथील तलाठी राजेंद्र निवास मोहिते (वय ४८, मूळ रा. मनव, ता. कऱ्हाड , सध्या रा. कार्वे नाका, कऱ्हाड ) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

ठळक मुद्देगोडवाडीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यातबक्षीसपत्राच्या नोंदीसाठी पैसे : उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा

उंब्रज : बक्षीसपत्राची नोंद करून सातबारा आणि फेरफार उतारा देण्यासाठी दीड हजाराची लाच घेताना गोडवाडी (उंब्रज) ता. कऱ्हाड येथील तलाठी राजेंद्र निवास मोहिते (वय ४८, मूळ रा. मनव, ता. कऱ्हाड , सध्या रा. कार्वे नाका, कऱ्हाड ) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित तक्रारदाराला बक्षीसपत्राची नोंद करून तसा सातबारा आणि फेरफार हवा होता. त्यासाठी तक्रारदार मौजे गोडवाडी, ता. कऱ्हाड सजा उंब्रज येथील कार्यायात गेले.

या ठिकाणी तलाठी राजेंद्र मोहिते याने तक्रारदाराकडे बक्षीसपात्राची नोंद करून घेण्यासाठी दोन हजारांची मागणी केली. अखेर तडजोडीनंतर दीड हजार रुपये घेण्याचे मोहिते याने मान्य केले.

त्यानंतर संबंधित तक्रारदाराने याबाबतची रितसर तक्रार लाचलुचतपच्या अधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार सोमवारी दुपारी उंब्रज येथील मंडलाधिकाऱ्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांनी सापळा लावला.

यावेळी राजेंद्र मोहिते याला दीड हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याला सातारा येथील लाचलुचपतच्या कार्यालयात आणण्यात आले. त्याच्याकडे अधिकारी कसून चौकशी करत आहेत. उंब्रज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत मोहितेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर