शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

उसाला ३,५०० पहिला हप्ता द्या:रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:48 PM

सातारा : ‘फितूर राजू शेट्टींसारख्या लोकांना हाताशी धरून अच्छे दिन वाल्या या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. नीरव मोदी, ...

सातारा : ‘फितूर राजू शेट्टींसारख्या लोकांना हाताशी धरून अच्छे दिन वाल्या या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या हे कर्ज बुडवून गेले तरी बँका बुडाल्या नाहीत. मग लाखात कर्ज असून शेतकरी काळजीने आत्महत्या करत आहेत. अशावेळी रडत बसू नका तर लढण्यासाठी तयार राहा. हमीभाव नसल्याने आता कर्ज बुडवा,’ असा सल्ला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी उसाला ३,५०० रुपये पहिला हप्ता द्यावा, असे स्पष्ट केले.क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ते बोलत होते. क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, शंकरराव गायकवाड, महिला आघाडी राज्यध्यक्षा वंदना माळी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पठारे, संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष विकास जाधव, टी. के. आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.रघुनाथदादा म्हणाले, ‘रिकव्हरीचा पाया बदलून तुमचा खिसा कापला जात आहे. गुजरातमध्ये टनाला ४,७४१ रुपये भाव आहे. तुमच्या उसाला १,५०० रुपये कमी देत आहेत. एकरकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी आहे. ३,५०० रुपये पहिला हप्ता मिळण्याची गरज आहे. उपपदार्थातील ५० टक्के नफा मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून लढा उभा केला पाहिजे. ऊस बिलातून अनेक कारणांनी पैसे कापले; पण भामट्या कारखानदार व सरकारने या ठेवी बुडविण्याचे पाप केले आणि ठेवींचे रुपांतर शेअर्समध्ये केले. डिव्हिडंट नसल्याने शेतकºयांचे नुकसान आणि कारखान्याचे शेअर भांडवल वाढले आहे.आपेट म्हणाले, ‘सदाभाऊ खोत यांची २३ रोजी ऊस परिषद होत असून, त्याला मुख्यमंत्री येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ऊस परिषद कशासाठी? एफआरपीचे २५५ कोटी रुपये शेतकºयांना शासनाकडून येणे आहे. ती अगोदर मिळणे आवश्यक आहे.’एफआरपीचे तुकडे करणाºयांचा निषेध...‘मागीलवेळी शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी एफआरपीच्या वर २०० रुपये घेऊन आंदोलन मागे घेतले. केवळ रघुनाथदादा पाटील यांनी शेवटपर्यंत ३,५०० रुपयांच्या एफआरपी वर ठाम राहिले. त्यामुळे एफआरपीचे तुकडे करणाºयांचा आम्ही निषेध करतो. शेतकºयांची वीज कपात होत असताना सत्ताधारी आणि विरोधक हे गप्प बसत आहेत, याचा आम्ही निषेध करतो, असे शिवाजीराव नांदखिले यांनी स्पष्ट केले.