शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara- एसटी आरक्षण: माण तालुका बंदच्या हाकेला १०० टक्के यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 13:30 IST

धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्या, म्हसवडमध्ये सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच

म्हसवड : सरकारने धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गत सहा दिवसांपासून तीन युवक आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निद्रेत असलेल्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने गुरुवारी माण तालुका बंदची हाक दिली होती. त्या हाकेला म्हसवडसह प्रमुख गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आपापली दुकाने १०० टक्के बंद ठेवून बंद यशस्वी केला.राज्यात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला राज्यघटनेने आदिवासी (एसटी)चे आरक्षण दिले आहे. मात्र, शासन धनगर व धनगड या शब्दाचा भेद करून धनगर समाजाची आजवर दिशाभूल करीत आले आहे, यापुढे शासनाने धनगर समाजाची दिशाभूल न करता या समाजाला घटनेप्रमाणे एसटी आरक्षण मिळण्याकरिता ‘धनगड’ची ‘धनगर’ अशी दुरुस्तीची शिफारस केंद्र सरकारकडे करावी, याप्रमुख मागणींसह राज्यातील सर्व धनगर समाजाच्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी केलेल्या सर्व आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करून एसटीचे सर्टिफिकेट वितरित करावे, या मागणीकरिता धनगर समाजाच्या उत्तम वीरकर, गणेश केसरकर, प्रकाश हुलवान या तीन युवकांनी म्हसवड नगरपालिकेसमोर दि. २६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.जोपर्यंत ‘धनगड’ची ‘धनगर’ अशी दुरुस्तीची शिफारस केंद्राला जात नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा निर्धार या उपोषकर्त्यांनी केला. यासाठी त्यांनी गत सहा दिवसांपासून म्हसवड पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने गुरुवार, दि. १ फेब्रुवारी रोजी माण तालुका बंदची हाक दिली होती. त्या हाकेला म्हसवडसह माण तालुक्यातील प्रमुख गावांतील अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद ठेवत धनगर समाजाच्या विविध न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला असल्याचे दिसून येते. तसेच गुरुवारी सकाळी म्हसवडमध्ये धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDhangar Reservationधनगर आरक्षण