शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पराभव खुल्या मनाने स्वीकारला, तुमच्या पराभवाची कारणं द्या; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:19 IST

तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, कार्यकर्त्यांचे विकपॉईंट हेरुन त्यांच्या नाडया आवळता. जनतेमुळे आम्ही आहोत, ही भावना आमची, तर जनता आमच्यामुळे आहे, अशी भावना तुमची.

सातारा : आमचा पराभव आम्ही खुल्या मनाने स्वीकारला आहे. विजय झाला त्यावेळी हुरळूनही गेलो नाही. आमच्या लोकसभेतील पराभवाची कारणं विचारताय तर, आधी तुमच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवाची कारणं द्या. ती जी कारणे असतील तीच आमची समजा, असा पलटवार करताना, खासदार उदयनराजे भोसले यांनी, बँक कायदेशीर मर्ज केली, असे म्हणता, तर मर्ज करण्यासाठीच बँक स्थापन केली होती का? एक बँक तुमच्या अंदाधुंद, भ्रष्ट कारभाराने बुडीत काढली; पण त्याकरिता दुसऱ्या बँकेचाही गळा घोटला. सहकार बझारचे रेस्टॉरंट केले, ते रेस्टॉरंटही बंद पाडले. हे प्रकार सहकारातील तत्त्वज्ञानात येत नाहीत, परंतु हाच तुमचा खरा वारसा आहे, हे तुम्ही दाखवून दिले आहेे, अशा खरमरीत शब्दात उदयनराजेंनी प्रतिउत्तर दिले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथून दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, आमचा आणि तुमचा मार्ग वेगळा तर आहेच, तसेच अन्य काही बाबी आणि उद्दिष्टदेखील वेगळी आहेत. आम्ही जनसामान्यांना आमचे समजतो, नि:स्वार्थी मनाने काम करतो, तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, कार्यकर्त्यांचे विकपॉईंट हेरुन त्यांच्या नाडया आवळता. जनतेमुळे आम्ही आहोत, ही भावना आमची, तर जनता आमच्यामुळे आहे, अशी भावना तुमची. सहकारी संस्था सभासदांच्या मालकीच्या आणि उद्धारासाठी आहेत, ही आमची धारणा, तर सहकार म्हणजे स्वतःची खासगी मालमत्ता ही तुमची धारणा. असा जो काही फरक आहे, तो मूलभूत फरक आहे. त्यामुळे दोघांमधील विचारांची उंची व खोलीसुध्दा वेगळी आहे. दुसऱ्याच्या पराभवाची कारणे विचारणारे तुम्ही स्वतःला अहंकारी आणि अहंमन्यदेखील समजता आहात. अहंकाराने सर्वनाश होतो, हे तुम्ही जाणीवपूर्वक विसरत आहात.

अजिक्यतारा कारखाना निवडणूक लागल्यावर एकदा भ्रष्ट कारभाराबाबतची अपराधी भावना घेऊन तुम्ही आमच्याकडे आला होता. निवडणुकीत लक्ष घालू नका, मी सर्व चुकांची दुरुस्ती करतो ,असेदेखील म्हणाला होता. हे इतक्या लवकर कसे विसरलात? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर आम्ही छाती काढून सभासदांपुढे गेलो तर, तुमची छाती जाऊन, नुसत्या बरगडया राहतील, याची पहिल्यांदा नोंद घ्या आणि मग आमच्या छातीकडे या, असेही निवेदनात म्हटले आहे.

तुमचे ते काम आणि आमचा तो स्टंट, असा शोध तुम्ही लावलेला आहे. ती तुमची वैचारिक दिवाळखोरी आहे, असे नमूद करून, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमूद केले आहे की, आम्ही ज्यावेळी एखादा प्रकल्प अंतिम टप्प्यात येतो, त्यावेळी त्याची निधीच्या आकडेवारीसह आणि तांत्रिक बाबींसह माहिती देतो. तुमच्यासारखे प्रत्येक टप्प्यावर मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्त. दादा यांच्याजवळ जाऊन बातमी आणि त्यांचा फोटो छापत नाही. तुम्हाला इतर ठिकाणी कोणी विचारतच नाही, त्यामुळे त्याची बातमी नाही आणि फोटोसुध्दा नाही. तुम्ही परफेक्शनिस्ट नव्हे, तर फंक्शनिष्ट आहात. असला प्रकार तुमचा तुम्हालाच शोभून दिसतो. हा फरकसुध्दा एक आपल्या मार्गातील वेगळेपण दाखवणारा आहे.सातारा-कराड हे जंक्शन नाही त्यामुळे येथून गाडी सुरू करता येत नाही, याचेदेखील यांना भान नाही. सध्या ३८ रेल्वेगाड्या सातारा आणि कराडमधून धावतायत. एकदा डोळ्यात अंजन घालून बघा म्हणजे दिसेल आणि समजेल. सातारा शहरात रस्त्यांची कामे साविआमार्फत वेळोवेळी झाली आहेत. आमच्या घरासमोरील रस्ता झाला किंवा नाही झाला तरी सामान्य सातारकरांच्या गल्ली-बोळातील रस्ते झाले पाहिजेत, अशी आमची प्रशासनाला विनंती सूचना आहे. विकासपुरुष कदाचित तुम्हीच आहात. कारण विकासरत्नांचा वारसा लाभलेला आहे. असेदेखील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फटकारले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले