येथील श्रीमळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेत इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थिनींसाठी ‘कुमारवयाशी सुसंवाद’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापिका सुलोचना भिसे यांच्यासह शिक्षिका उपस्थित होत्या.
कन्याशाळेत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. कार्यशाळेत स्वओळख, अभ्यासाचे नियोजन, ताणतणावाचे व्यवस्थापन, लैंगिक शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, विविध व्यसने व त्यांचे शरीरावरील परिणाम अशा विविध विषयांचे सखोल मार्गदर्शन केले जाते. यावेळी डॉ. शर्वरी बेलापुरे यांनी विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून समुपदेशन केले.
ठाणे जिल्हा नारी संघटना व पोलीस दल यांच्या सहकार्याने आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांचा जिज्ञासा प्रकल्प सुरू आहे. त्याअंतर्गत डॉ. बेलापुरे यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या कार्यशाळेत विद्यार्थिनींना त्यांच्या ‘स्व’ची जाणीव होण्यासाठी कृतीयुक्त प्रशिक्षण दिले. त्यामुळे या प्रशिक्षणास मुलींची उपस्थिती लक्षणीय होती. शाळेच्या या उपक्रमाबद्दल महिला पालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो : ०६केआरडी०३
कॅप्शन : मलकापूर येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेत आयोजित कार्यशाळेत डॉ. शर्वरी बेलापुरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.