शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मायणीत गाढवाने घेतला बालिकेचा चावा, गंभीर जखमी; गाढव मालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 11:28 IST

डोक्याचा चावा घेऊन फरफटत नेले

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी येथील बसस्थानकाच्या पाठीमागे राहणाऱ्या तीन वर्षांच्या बालिकेच्या डोक्याला गाढवाने चावा घेतल्याने बालिका गंभीर जखमी झाली. माहिरा मोहसीन मुजावर (वय ३, रा. मायणी, ता. खटाव) असे जखमी झालेल्या बालिकेचे नाव आहे. उपचारासाठी कऱ्हाड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेनंतर गाढव मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी मोकाट जनावरांबाबत परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून व प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मायणी येथील बसस्थानकाच्या पाठीमागे राहणारी माहिरा हातात पैसे घेऊन खायला आणण्यासाठी निघाली होती. त्यावेळी रस्त्यावर उभा असलेल्या गाढवाने तिच्या डोक्याचा चावा घेऊन फरफटत नेले, त्यावेळी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी तिची गाढवापासून सुटका केली.मात्र, गाढवाचा चावा इतका गंभीर होता की, तिच्या डोळ्यावरील बाजूस व डोक्यावरील केसाचा पूर्ण भाग रक्तबंबाळ झाला. तिच्यावर मायणी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी विटा, मिरज या ठिकाणी नेले. मात्र या ठिकाणी योग्य उपचार न मिळाल्याने तिला शेवटी कऱ्हाड या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाळीव गाढव सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता गाढव मालक राजेंद्र धोत्रे यांनी गाढव सोडल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आनंदा गंबरे करत आहेत.मोकाट जनावरांमुळे सतत लहान-मोठे अपघात मायणी मुख्य बाजारपेठ, मुख्य मार्गावर अनेक मोकाट कुत्री, माकडे, गाढवे तसेच डुकरे फिरत असल्याने परिसरात सतत लहान-मोठे अपघात घडत आहेत. तसेच कुत्री, डुकरे, गाढव व माकडांचा कळप परिसरामध्ये असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर