शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरमधील लिंगमळा परिसरात गव्यांचा धुडगूस, स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 18:04 IST

गव्याचे कळप स्ट्रॉबेरी शेतीला लक्ष्य करीत आहेत.

महाबळेश्वर : लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरीच्या शेतीवर गव्याच्या कळपाने हल्ला केला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या स्ट्रॉबेरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात रानगव्यांची संख्या झपाट्याने मोठ्या वाढू लागली आहे. या गव्यांच्या उपद्रवामुळे महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शेती धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यावर्षीचा पाऊस उशिरापर्यंत लांबल्यामुळे महाबळेश्वर ते अवकाळी या भागात स्ट्रॉबेरी पिकाची उशिरा लागवड करण्यात आली. त्यामुळे अजूनपर्यंत या भागातील स्ट्रॉबेरी पिकाला फळे आली नाहीत. अशातच गव्याचे कळप स्ट्रॉबेरी शेतीला लक्ष्य करीत आहेत. मंगळवारी मध्यरात्री लिंगमळा येथे राहणारे संतोष धनावडे, सुनील बावळेकर, चद्रकांत धनावडे, दीपक बावळेकर व इतर अनेक शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये २० ते २५ गव्यांचा कळप शिरला होता. कळपातील गव्यांनी स्ट्रॉबेरीची रोपे खाऊन टाकली. स्ट्रॉबेरी पिकाला माती लागू नये व खराब होऊ नये म्हणून हजारो रुपये खर्च करून त्यावर काळा प्लास्टिकचा पडदा टाकला होता. त्याचेही या रानगव्यांनी मोठे नुकसान केले आहे. लिंगमळा परिसरातील ५० ते ६० एकर शेती या गव्यांनी तुडवल्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतामध्ये शेतकरी आले असता त्यांना रानगव्यांनी केलेल्या शेताच्या नुकसानीची माहिती मिळाली. वन वनविभागाने या स्ट्रॉबेरी पिकाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संतोष बावळेकर, शरद बावळेकर यांनी वन विभागाकडे करू लागले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान